पिंपळगावमधील शेतकऱ्याकडून जनावरांच्या पाण्याची मोफत सोय:जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

0
240_177711571669eca2448fe84_81579995915.jpg




लासूर स्टेशन | उन्हाळ्याची चाहूल लागताच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. रब्बी हंगामात भरमसाठ पाणी उपसा झाला. त्यामुळे सार्वजनिक तलाव, ओढे, नाले कोरडे ठाक पडले आहेत. भरपूर पाऊस पडूनही पाणवठे आटले आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपळगाव (ता. गंगापूर) येथील सुशिक्षित शेतकरी बाळासाहेब जयवंतराव वावरे यांनी स्वेच्छेने पुढाकार घेतला. त्यांनी आपल्या खळ्यातील मोठा हौद स्वच्छ केला. नवीन पाईपलाईन टाकली. जवळच्या हाळातून दररोज हजारो लिटर पाणी हौदात भरले जात आहे. या पाण्याचा उपयोग पिंपळगावातील शेतकऱ्यांच्या जनावरांना होत आहे. इतर मुक्या प्राणी, पक्ष्यांनाही पाणी मिळत आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर या उपक्रमाचे गावकऱ्यांनी स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed