राज्यावर पाणीटंचाईचे सावट:धरणांत केवळ 43 टक्के पाणी, पुण्यातील स्थिती चिंताजनक; राज्यात गेल्या वर्षी यंदाच्या तुलनेत हा साठा 7 टक्क्यांनी होता अधिक

0
orig_730-x-548-new-2026-04-27t064129758_1777252258.jpg




राज्यात सूर्याचा पारा चढू लागल्याने धरणांतील साठा वेगाने खाली जात असून महाराष्ट्रावर पाणीटंचाईचे सावट अधिक गडद झाले आहे. जलसंपदा विभागाच्या २५ एप्रिलच्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यातील ३०२८ प्रकल्पांमध्ये आता केवळ ४३.२३% उपयुक्त साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशीच्या तुलनेत हा साठा ७ टक्क्यांनी जास्त असला तरी मे महिन्यातील कडाक्याचे ऊन आणि वाढता बाष्पीभवनाचा वेग पाहता प्रशासनासमोर पाण्याचे ‘सूक्ष्म नियोजन’ करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सर्वाधिक चिंता पुणे विभागाची आहे. येथे अवघा ३६.३०% साठा उरला आहे. पाण्याचे बाष्पीभवन वेगाने तापमान ४० अंशांच्या पार गेल्याने धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. मध्यम व लघु प्रकल्पांची स्थिती तर अधिक बिकट आहे. राज्यातील १३८ मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या १२,४२३ दलघमी पाणी उपलब्ध असले तरी मेअखेरपर्यंत हे साठे तळ गाठण्याची शक्यता आहे. इनसाइट- वाटप व काटकसरीचा वापर गेल्या वर्षीच्या ३६.४० टक्क्यांच्या तुलनेत यंदाचा ४३.२३ टक्के साठा हा तांत्रिकदृष्ट्या दिलासादायक वाटू शकतो. मात्र, या आकडेवारीच्या मागे एक मोठे वास्तव दडलेले आहे. यंदा उन्हाची तीव्रता अधिक असल्याने बाष्पीभवनाचा वेग गेल्या वर्षीपेक्षा २५ टक्क्यांनी जास्त आहे. त्यातच पुणे विभागातील नीचांकी साठ्यामुळे राज्यातील ‘प्रादेशिक जल-असमतोल’ स्पष्टपणे समोर आला आहे. केवळ टँकरमुक्त गावे जाहीर करण्यापेक्षा आता शहरी आणि ग्रामीण भागात पाण्याचे समन्यायी वाटप आणि काटकसरीचा वापर हेच शेवटचे शस्त्र उरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed