पैशासाठी पत्नीचा खून  – VastavNEWSLive.com

0
ChatGPT-Image-Apr-24-2026-04_42_40-PM.jpg


उमरी (प्रतिनिधी) – शहरातील बैल बाजार रेस्ट हाऊस समोरील परिसरात पैशांच्या वादातून २३ वर्षीय तरुणीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना २० एप्रिल २०२६ रोजी रात्री ९ ते १० वाजण्याच्या सुमारास घडली.

मृत तरुणीचे नाव अंजली कृष्णा गंटलवार (वय २३, रा. बैल बाजार, उमरी) असे असून आरोपी तिचा पती कृष्णा उर्फ किशन काशीराम गंटलवार (वय २५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैशांच्या मागणीवरून झालेल्या वादातून आरोपीने अंजलीचा हाताने गळा दाबून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी राजू पोशेट्टी मडकलवार (वय ४०, रा. कलंबर, ता. कंधार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक  पोपलवार हे करीत असून आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


Post Views: 7






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *