कॉर्पोरेट जिहाद, दानिश शेखचा दुसऱ्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन फेटाळला:निदा खान फरारच, दुसरा आरोपी तौफिकची भूमिकाही संशयास्पद

0
orig_new-project-2026-04-21t072208270_1776905939.jpg




टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे शोषण करून त्यांना धर्मांतराला प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात आरोपी दानिश शेख याला एसआयटीकडून दुसऱ्या गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता आहे. ती टाळण्यासाठी त्याने अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला. या प्रकरणात एसआयटीकडून नियुक्त विशेष सरकारी वकील किरण बेंडभर यांनी अटकपूर्व जामिनाला विरोध केला. तर आरोपीच्या वतीने दानिशविरोधातील तक्रारी चुकीच्या असल्याचा दावा करण्यात आला. कोर्टरूम लाइव्ह किरण बेंडभर (सरकारी वकील): आरोपीविरुद्ध बलात्कार, ॲट्रॉसिटीसारखे गंभीर गुन्हे असून समाजात पडसाद उमटले आहेत.
उमेश वालझाडे (आरोपीचे वकील) : फिर्यादी आणि आरोपी एकाच कंपनीत काम करतात. तेथील वादाचा राग मनात धरून फिर्यादीने हा खोटा गुन्हा दाखल केला आहे. त्या दिवशी वाद झाला नाही. जातिवाचक शिवीगाळही झाली नाही.
सरकारी वकील : आरोपीने पीडितेशी अश्लील वर्तन केले. ‘मुले होत नसतील तर माझ्याकडे पाठवा’ असे गंभीर वक्तव्य केल्याची तक्रार आहे. दुसरा आरोपी तौफिक खान याचीही भूमिका संशयास्पद असून आरोपीला मोकळे सोडल्यास तपासावर परिणाम होऊ शकतो.
आरोपीचे वकील : मुळात दोन्ही आरोपी पोलिसांच्याच ताब्यात असून त्यांना पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची गरज नाही.
निदासाठी पथके रवाना : मुख्य आरोपी निदा खानचा तात्पुरता अटकपूर्व जामीन न्यायालयाने नामंजूर केल्याने कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. तिच्या शोधासाठी एसआयटीकडून मुंबई, मुंब्रा, पुण्यासह ठिकठिकाणी पथके पाठवली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed