हिंगोलीचे माजी आमदार बळीराम पाटील कोटकर यांचे निधन:भाजपाचा सच्चा कार्यकर्ता हरपल्याची भावना, दुपारी तीन वाजता भानखेडा येथे होणार अंत्यसंस्कार
![]()
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या आकाश मोरेंनी माघार घेतली असली तरी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवार निवडणूक रिंगणात असून आज (गुरुवारी 23 एप्रिल) त्यासाठी मतदान होत आहे. निवडणुकीत प्रामुख्याने सुनेत्रा पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) विरोधात राघू घुटुकडे (न्यू राष्ट्रीय समाज पार्टी), सतीश कदम (हिंदुस्थान जनता पार्टी), करुणा धनंजय मुंडे (अपक्ष) व अभिजित बिचुकले (अपक्ष) यांच्यात प्रमुख लढत होईल असे चित्र आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत निवडणूक निरीक्षक व अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. राहुरी पोटनिवडणुकीसाठी 7 उमेदवारांत लढत होणार राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे रिंगणात आहेत. 4 मे रोजी या निवडणुकीचा निकाल लागेल. शरद पवार पहिल्यांदाच मतदानापासून वंचित 1962 पासून प्रत्येक निवडणुकीत बारामतीत मतदान करणारे शरद पवार हे या वेळी तब्येतीच्या कारणाने मतदानासाठी उपस्थित राहणार नाहीत. मुंबईत उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे बारामतीच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच ते मतदान करणार नाहीत. मुंबईतून मतदान करण्यासंदर्भात प्रयत्न केले पण ते शक्य होऊ शकले नाही, असे पवारांनी म्हटले आहे. त्यांनी आवाहन करून सून आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला आहे. सुनेत्रा पवारांना किती मते पडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उन्हाचा कडाका लक्षात घेता मतदान केंद्रांबाहेर मंडपांची व्यवस्था करण्यात आली आहे. रांग मोठी झाल्यास मतदारांना वेटिंगरूममध्ये बसवून क्रमाक्रमाने केंद्रात सोडले जाईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांनी दिली. प्रत्येक 10 केंद्रांमागे एक रुग्णवाहिका आणि प्रथमोपचारासाठी अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना साहित्य थेट केंद्रावरच उपलब्ध करून दिल्याने त्यांचा वेळ वाचला आहे. दरम्यान, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, पिण्याचे पाणी, शौचालय आणि सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. या 12 पर्यायी कागदपत्रांवर करता येईल मतदान ज्या मतदारांकडे निवडणूक ओळखपत्र नाही, त्यांना निवडणूक आयोगाने 12 पर्यायी कागदपत्रांना मान्यता दिली आहे. यापैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत ठेवल्यास मतदान करता येईल : आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बँक किंवा पोस्टाचे फोटो असलेले पासबुक आणि इतर 6 अधिकृत कागदपत्रे. राहुरी मतदारसंघाचा लेखाजोखा एकूण मतदार: 3,33,545 पुरुष मतदार: 1,72,231
महिला मतदार: 1,61,312 एकूण मतदान केंद्रे: 374 170 पैकी 163 जणांनी केले “होम मतदान” राहुरी निवडणुकीसाठी 36 पोलिस अधिकारी, 708 पोलिस कर्मचारी आणि 391 होमगार्ड तैनात आहेत. 34 सेक्टर अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, मतदान संपल्यानंतर साहित्य संकलनाची जबाबदारी त्यांच्याकडे असेल. 85 वर्षांवरील वृद्ध आणि दिव्यांगांसाठी “होम मतदान” सुविधेअंतर्गत 170 पैकी 163 मतदारांनी आपला हक्क बजावला आहे.
हिंगोली विधानसभेचे भाजपाचे माजी आमदार बळीराम पाटील कोटकर (85) यांचे अल्पशः आजाराने निधन झाले आहे. त्यांच्यावर गुरुवारी ता. 23 दुपारी तीन वाजता त्याच्या मुळ गावी भानखेडा (ता. सेनगाव) येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या निधनाने भाजपाचा सच्चा कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथील रहिवासी असलेले माजी आमदार बळीराम पाटील कोटकर हे जिल्हयात बापू या नावाने परिचीत होते. त्यांच्या मनमिळावू स्वभावा मुळे त्यांचा जिल्हाभरात दांडगा जनसंपर्क होता. भाजपाचे तत्कालीन नेते प्रमोद महाजन, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू पदाधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. हिंगोली विधानसभेसाठी भाजपाने त्यांना 1990 साली उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून विजय मिळविला होता. त्यानंतर 1995 च्या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळविला होता. दोन वेळा त्यांनी हिंगोली विधानसभेचे नेतृत्व केले. अत्यंत करारीबाणा असलेले नेतृत्व म्हणून त्यांची शासन दरबारी ओळख होती. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी हिंगोली विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली. हिंगोली जिल्हा निर्मितीमध्येही त्यांचे मोठे योगदान होते. कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असत त्यामुळे हिंगोली येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांचा नेहमीच राबता असायचा. मागील काही दिवसांपासून ते वृध्दापकाळामुळे आजारी होते. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर त्यांच्या मुळगावी भानखेडा येथे दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, चार नातू, 4 मुली, सुना असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने भाजपाचा सच्चा कार्यकर्ता हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाने हिंगोली विधानसभा मतदार संघावर शोककळा पसरली आहे.
