ताहाराबादला सहा महिन्यांत विहीर खोदून पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार:आश्वासनानंतर चित्ते यांचे उपोषण मागे; स्मशानभूमी रस्त्याचा प्रश्न निकाली काढणार‎

0
242_177686334869e8c874e88d7_taharabhad1.jpg



बागलाण तालुक्यातील ताहराबाद येथे गावातील रखडलेला पाणीपुरवठा व स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या प्रश्नावर काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलचे पदाधिकारी मिलिंद चित्ते यांनी सोमवारी (दि. २०) उपोषण सुरू केले होते. सायंकाळी संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार

.

अनेक दिवसांपासून ताहराबाद गावातील पाणीपुरवठा आणि स्मशानभूमी रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला असून, नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. जलजीवन विभागाचे अधिकारी व ठेकेदारांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळतन सल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. या प्रश्नांवर अनेकदा पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे तोंडी तसेच लेखी तक्रारी करूनही तोडगा न निघाल्याने अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात आला. या सामाजिक मुद्याला ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला. काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिल पाटील, शिवसेनेचे सुभाष नंदन, आदिवासी परिषदेचे प्रवीण पवार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन समर्थन व्यक्त केले. खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. उपोषणाची दखल घेत जलजीवन विभागाचे अधिकारी, ठेकेदार तसेच पंचायत समितीचे अधिकारी यांनी उपोषणस्थळी भेट दिली. त्यांनी सहा महिन्यांत गावात नवीन विहीर खोदून पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे तसेच स्मशानभूमी रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर मिलिंद चित्ते यांनी सायंकाळी लिं बूपाणी घेऊन उपोषण मागे घेतले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामाजिक प्रश्नांसाठी शासनदरबारी लढा सुरू ठेवणार लेखी आश्वासन मिळाल्यामुळे गावातील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास निर्माण झाला आहे. ग्रामस्थ समाधान व्यक्त करत असून, आगामी काळातही सामाजिक प्रश्नांसाठी शासनदरबारी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. – मिलिंद चित्ते, उपोषणकर्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed