विधानसभा पोटनिवडणूक:बारामतीत सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवार रिंगणात तर राहुरीत अक्षय कर्डिलेंसह 7 उमेदवार रिंगणात
![]()
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या आकाश मोरेंनी माघार घेतली असली तरी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवार निवडणूक रिंगणात असून आज (गुरुवारी 23 एप्रिल) त्यासाठी मतदान होत आहे. निवडणुकीत प्रामुख्याने सुनेत्रा पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) विरोधात राघू घुटुकडे (न्यू राष्ट्रीय समाज पार्टी), सतीश कदम (हिंदुस्थान जनता पार्टी), करुणा धनंजय मुंडे (अपक्ष) व अभिजित बिचुकले (अपक्ष) यांच्यात प्रमुख लढत होईल असे चित्र आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत निवडणूक निरीक्षक व अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. राहुरी पोटनिवडणुकीसाठी 7 उमेदवारांत लढत होणार राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे रिंगणात आहेत. 4 मे रोजी या निवडणुकीचा निकाल लागेल.
