मधुमित्र व मधुसखी पुरस्कारासाठी 4 मेपर्यत नामांकन अर्ज सादर करण्याचे आवाहन ; महिला मधपाळासाठी एक पुरस्कार राखीव

0
ChatGPT-Image-Apr-22-2026-03_05_43-PM.jpg


नांदेड – महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने 2026 साठी मधुमित्र व मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने मागविण्यात येत आहेत. या पुरस्कारासाठी लिंक मंडळाच्या www.mskvib.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या कार्यालयात नामांकन अर्ज मिळू शकतील. इच्छुकांनी आपले नामांकन अर्ज 4 मे 2026 पुर्वी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात पाठवावेत, असे आवाहन ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

मंडळाच्यावतीने गेल्या तीन वर्षापासून ही पुरस्कार योजना सुरु केली आहे. मधमाशीपालन व्यवसायासास गती मिळावी व मधपाळांना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाने हा उपक्रम सुरु केला आहे. मधमाशी पालनात अनेक वर्षे काम करणाऱ्या यशस्वी मधपाळांना प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्काराने या पुरस्कार योजनेत सन्मानीत करण्यात येते. यातील एक पुरस्कार महिला मधपाळासाठी राखीव आहे. प्रथम पुरस्कारासाठी रक्कम 11 हजार, द्वितीय पुरस्कारासाठी 7 हजार, तृतीय पुरस्कारासाठी 5 हजार व सन्मान चिन्ह अशी आहे. दिनांक 20 मे 2026 रोजी जागतीक मधमाशी दिनाचे औचित्य साधून जिल्हा नांदेड येथे जाहिर समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जातील. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी संजय सारंगधर, निरीक्षक ज्ञानेश्वर सदाशिव राऊतवार, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, उद्योग भवन एमआयडीसी एरिया शिवाजीनगर नांदेड दुरध्वनी क्रमांक 02462-240674, मो.क्र. 9689200239 यावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे

 


Post Views: 107






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed