अशोक खरातचा आणखी एक कारनामा!:लोकांच्या नावे बँक खाती उघडून लाटले लाखो रुपये, पोलिस आधीक्षकांनी दिली माहिती

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-04-21t150234609_1776763931.jpg




नाशिकच्या सिन्नरमध्ये भोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत तक्रारदाराच्या नावावर 32 बनावट खाती आहेत. बनावट खात्यांमधून 57 लाख 90 हजारांची फसवणूक झाली आहे. खरातसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी माहिती दिली आहे. बाळासाहेब पाटील म्हणाले, नाशिकच्या सिन्नरमध्ये जगदंबा माता बिगर शेती ग्रामीण पतसंस्था आहे. या पतसंस्थेत 32 लोकांनी, या लोकांना माहीत नव्हते की खरातने त्यांच्या नावावर खाती उघडली आहेत. या संदर्भातील संपूर्ण कागदपत्र अहिल्यानगर येथून प्राप्त झाली होती. त्यात खाती ओपन केलेली आहेत. त्यांना समक्ष बोलावले आहे. तपासात किती ट्रान्सॅक्शन झाले आहे, प्रत्येकाचे खाते कधी ओपन झाले आहे, त्या संदर्भातले मेसेजेस कुठे जात होते, याची संपूर्ण चौकशी तपासात केली जाणार आहे. या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानेही (ईडी) लक्ष घातले आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने जगदंबा पतसंस्थेवर छापा टाकून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली होती. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारांचे पुरावे मिळाल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदवत तपासाचा फास आणखी आवळला आहे. त्यामुळे केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर केंद्रीय यंत्रणाही या प्रकरणात सक्रिय झाल्या आहेत. दरम्यान, अशोक खरातचे ठाणे कनेक्शन समोर आले आहे. ठाण्यातील निवृत्त सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर कार्यालयातील महिला क्लर्कवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप आहेरवर आहे. इतकेच नव्हे तर व्हिडिओ व्हायरल करून वारंवार अत्याचार देखील त्याने केल्याचा आरोप आहे. ठाण्यातील कासर वडवली पोलिस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks