वेरूळ येथील शहाजीराजे गढीच्या जतन आणि संवर्धनावर विशेष भर:शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत छावा संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक‎

0
240_177659739469e4b992d73e6_gadhi.jpg




प्रतिनिधी | वेरूळ स्थानिक विकास, ऐतिहासिक वारसा जतन आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी छावा संघटनेने पुढाकार घेत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची महत्त्वपूर्ण भेट घेतली. या बैठकीत विविध विकासात्मक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा पार पडली. छावा संघटनेचे संस्थापक रवींद्र बोडखे यांनी आपले सहकारी श्रीकांत तौर यांच्यासह ही भेट घेतली. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अतुल चव्हाण, आमदार प्रशांत बंब उपस्थित होते. बैठकीदरम्यान परिसरातील रस्ते, इतर पायाभूत सुविधा आणि वेरूळ येथील ऐतिहासिक शहाजीराजे भोसले गढीच्या जतन व संवर्धनावर विशेष भर देण्यात आला. छावा संघटनेतर्फे शासनासमोर काही महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये २००७ मध्ये स्थापन समितीच्या कार्यकाळ व वैधतेबाबत स्पष्ट माहिती जाहीर करणे, समितीचे पुनर्गठन करून त्यामध्ये छावा संघटनेचे प्रतिनिधी व आमदार प्रशांत बंब यांचा समावेश करणे, छावा संघटनेच्या कार्याचा गौरव म्हणून गढी परिसरात संगमरवरी शिलालेख उभारणे, गढीचे संवर्धन भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण नियमांनुसार करण्यासाठी शासनाने आवश्यक सहकार्य करणे, या सर्व मागण्यांवर उपस्थित मान्यवरांनी सकारात्मक भूमिका दर्शवली आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks