पिंप्राळ्यात १५ मिनिटांत ६०० मीटरपर्यंत ओढल्या बारागाड्या:भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्याची परंपरा
![]()
पिंप्राळ्यात अक्षय्य तृतीयेला भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्याची परंपरा ७७ वर्षांपासून सुरू आहे. यंदा ३५ वर्षीय तरुण भगत हिरामण भील यांनी १५ मिनिटांत ६०० मीटर बारागाड्या ओढल्या. पिंप्राळा उड्डाण पुलापासून ते तलाठी कार्यालय असा उत्सव होता. गतवर्षी बारागाड्या निघाल्या त्या दिवशी पारा ४० अंशांच्या खाली होता. मात्र, या वर्षी रविवारी तापमान ४१ अंशांवर होते. म्हणून सायंकाळी बारागाड्या ओढल्या. गुलालाचे ताट फिरवले महिनाभर भगत हिरामण भील यांनी कोणाकडेही अन्न-पाणी घेतले नाही, की अंत्ययात्रेला गेले नाही. बारागाड्या ओढण्याच्या १० दिवस आधी पिंप्राळा गावातून घरोघरी गुलालाचे ताट फिरवण्यात आले. या ताटात भाविक आपल्या ऐपतीप्रमाणे पैसे टाकून गुलाल कपाळाला लावतात. याच पैशातून पूजाविधीचे साहित्य आणलेले होते. -छायाचित्र : आबा मकासरे
