Motion Sickness Remedies | प्रवासात मळमळ आणि उलटीचा त्रास होतोयं? ‘हे’ सोपे घरगुती उपाय नक्की करा
Motion Sickness Remedies | गाडी किंवा बसने प्रवास करताना अनेकांना मळमळ, उलटी किंवा अस्वस्थता जाणवते. ही समस्या वैद्यकीय भाषेत Motion sickness म्हणून ओळखली जाते. शरीर आणि मेंदू यांच्यातील समन्वय बिघडल्यामुळे ही समस्या निर्माण होते. त्यामुळे प्रवासाचा आनंदच कमी होतो.
औषधे घेण्याऐवजी काही सोपे आणि नैसर्गिक उपाय करूनही तुम्ही या त्रासावर नियंत्रण मिळवू शकता. चला, जाणून घेऊया काही प्रभावी घरगुती उपाय.
आलं (Ginger):
आल्यामध्ये मळमळ कमी करण्याचे गुणधर्म असतात. प्रवासापूर्वी किंवा दरम्यान आल्याचा छोटा तुकडा चावल्यास किंवा आल्याचा चहा घेतल्यास उलटी होण्याची शक्यता कमी होते.
लिंबू (Lemon):
लिंबाचा आंबटपणा आणि सुगंध मळमळ पटकन कमी करतो. प्रवासात लिंबू जवळ ठेवा. त्रास जाणवल्यास त्याचा वास घ्या किंवा थोडा रस चाखा.
पुदिना (Mint):
पुदिन्याची पाने पोट शांत ठेवतात आणि गॅस, मळमळ कमी करतात. पुदिन्याची पाने चावणे किंवा पुदिन्याचे पाणी पिणे फायदेशीर ठरते.
Motion Sickness Remedies | पचन सुधारण्यासाठी उपयुक्त उपाय :
लवंग (Clove):
लवंगामध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात. प्रवासात 1-2 लवंग चावल्याने उलटी थांबण्यास आणि तोंडाची चव सुधारण्यास मदत होते.
वेलची (Cardamom):
वेलची पचनक्रिया सुधारते आणि मळमळ कमी करते. प्रवासादरम्यान 1-2 वेलची खाल्ल्यास ताजेतवाने वाटते.
