Career After 10th | दहावीनंतर लगेच नोकरी हवी? तर ‘हे’ 7 बेस्ट कोर्स करा

0
105489755.webp.webp


Career After 10th | दहावी पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना लगेच कमाई सुरू करायची असते. अशा वेळी पारंपरिक शिक्षणाऐवजी स्किल-बेस्ड कोर्सेस निवडणे अधिक फायदेशीर ठरते. कमी कालावधीत पूर्ण होणारे आणि थेट नोकरीच्या संधी देणारे हे कोर्सेस करिअरसाठी मजबूत पाया तयार करतात. चला तर मग जाणून घेऊया दहावीनंतर लगेच नोकरी मिळवून देणारे बेस्ट कोर्सेस:

दहावीनंतर सर्वात लोकप्रिय पर्याय. इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, प्लंबर यांसारखे ट्रेड्स 1–2 वर्षांत पूर्ण होतात. कमी फी आणि जास्त जॉब संधी हे याचे फायदे आहेत.

Career After 10th | 2) कॉम्प्युटर कोर्सेस (Basic + Advanced)

MS-CIT, Tally, DTP, Data Entry हे कोर्स 3–12 महिन्यांत पूर्ण होतात. ऑफिस जॉब्स, अकाउंटिंग, वर्क फ्रॉम होम संधी मिळतात.

3) डिप्लोमा इन इंजिनिअरिंग:

Diploma in Engineering पॉलिटेक्निकद्वारे 3 वर्षांचा कोर्स aahe. Mechanical, Civil, Electrical, Computer या शाखांमध्ये करिअर करता येते.

4) हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग :

Hotel Management 6 महिने ते 2 वर्षांचे हे कोर्स आहेत. शेफ, वेटर, हॉटेल स्टाफ म्हणून देश-विदेशात संधी मिळू शकतात.

5) ब्युटी आणि पार्लर कोर्सेस :

Beauty Therapy मेकअप, हेअर स्टाइलिंग, स्किन केअर शिकून स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो.

6) रिटेल मॅनेजमेंट :

Retail Management मॉल्स, शोरूम्स, सुपरमार्केटमध्ये जॉब संधी. सेल्स, कस्टमर सर्व्हिस स्किल्स विकसित होतात.

7) मोबाईल रिपेअरिंग कोर्स :

Mobile Repairing 3–6 महिन्यांत पूर्ण होणारा हा कोर्स आहे. स्वतःचं दुकान सुरू करण्याचीही संधी मिळू शकते.

दरम्यान, विद्यार्थ्यांनो योग्य कोर्स निवडल्यास दहावीनंतरही तुम्ही कमी वेळात चांगली कमाई आणि स्थिर करिअर घडवू शकता.

News Title: Best Career Options After 10th: 7 Courses for Quick Jobs

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks