पोलिसाचा अनैसर्गिक संबंधांसाठी तगादा:24 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा; हिंगोली जिल्ह्यातील घटना

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-04-19t15_1776669841.png




नांदेड पोलिस अधीक्षक कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा तगादा लावल्यामुळे एका 24 वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, मृत तरुण हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आहे. त्याची नांदेड पोलिस अधीक्षक कार्यालयातील लिपिक अभिषेक सातपुते याच्यासोबत मागील 7-8 वर्षांपासून घनिष्ट मैत्री होती. पण कालांतराने या मैत्रीचे रुपांतर छळात झाले. गत शनिवारी (18 एप्रिल) हे दोघे वडगाव व आखाडा बाळापूर परिसरात एकत्र फिरत होते. यावेळी सातपुते यांनी मृत तरुणाकडे अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी तगादा लावला. त्यांच्या या सततच्या त्रासाला कंटाळून सदर तरुणाने वडगाव शिवारातील एका झाडाला गळ्यातील रुमालाने गळफास लावून आत्महत्या केली. आरोपी पोलिसाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ही घटना उजेडात आल्यानंतर संतप्त कुटुंबीय व गावकऱ्यांनी आरोपी अभिषेक सातपुते याच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय शवविच्छेदन करण्यास विरोध केला. यामुळे आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात मोठा तणाव निर्माण झाला. अखेर पोलिस उपाधीक्षक राजकुमारे केंद्रे यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर नागनाथ लाखाडे यांच्या तक्रारीनुसार, अभिषेक सातपुते याच्यावर आत्महत्येत प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर जवळपास 22 तासांनी शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडली. सध्या पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. प्रेम प्रकरणातून तरुणावर हल्ला दुसरीकडे, भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील हरदोली गावात प्रेम प्रकरणाच्या संशयातून एका तरुणावर रविवारी मध्यरात्री प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत राजू राऊत नामक 24 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा तरुण उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे घराच्या अंगणात झोपला होता. त्यावेळी 4-5 जणांनी धारदार शस्त्रांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. यावेळी जिवाच्या आकांताने सदर तरुणाने आरडाओरडा केला असता हल्लेखोर पसार झाले. जखमी तरुणावर सध्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. ही घटना प्रेम प्रकरणाच्या संशयातून घडल्याची चर्चा आहे. या प्रकरणी सिहोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks