आषाढीत वारकऱ्यांची सुरक्षा ‘टॉप प्रायोरिटी':जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी घेतला आढावा‎

0
app_177625038869df6e14a1f50_1005119520.jpg




आषाढी शुद्ध एकादशीचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, या यात्रा कालावधीत पंढरीत येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. “पालखी मार्ग, पालखी तळ, विसावा आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पाणी, आरोग्य, सुरक्षेसोबतच रस्ते दुरुस्ती, शौचालय सुविधा आणि स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिली. आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीसाठी श्री विठ्ठल- रुक्मिणी भक्त निवास येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, वारकऱ्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने पाहणी करून पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती वारीपूर्वी पूर्ण करावी. भाविकांना कोठेही रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे त्रास होता कामा नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. ^”वारी सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. सीसीटीव्ही यंत्रणा आणि आपत्कालीन व्यवस्थेवर आमचा विशेष भर असेल. भाविकांच्या आरोग्याची आणि सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाने घेतली आहे.” कार्तिकेयन एस., जिल्हाधिकारी

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks