माळेगाव शिवारात देशीदारूच्या 13 बॉक्ससह 5.57 लाखांचा मुद्देमाल जप्त:दोघांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

0
whatsapp-image-2026-04-14-at-90117-am_1776143403.jpeg




हिंगोली ते आखाडा बाळापूर मार्गावर माळेगाव शिवारात पोलिसांच्या पथकाने एका कारसह देशीदारूचे 13 बॉक्स असा 5.57 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 13 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला असून दोघांनाही ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली ते माळेगाव मार्गे शेंबाळपिंपरी कडे एका कारमधून देशीदारूच्या बॉक्सची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधिक्षक मयूर रसाळ, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार भुजंग कोकरे, हरिभाऊ गुंजकर, ज्ञानेश्‍वर गोरे, आकाश टापरे, विशाल खंडागळे यांच्या पथकाने सोमवारी रात्री आठ वाजल्या पासून वाहनांची तपासणी सुरु केली होती. दरम्यान, देशीदारूच्या बॉक्सची कारमधून वाहतूक केली जात असल्याने पोलिसांनी कारचीही तपासणी चालवली होती. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना एका कारचा संशय आल्याने चालकास कार थांबविण्यास सांगितले. यावेळी चालक करण व्हडगिर व संजय कुरील (दोघे रा. हिंगोली) यांची चौकशी सुरु केली. मात्र पोलिसांना पाहताच दोघांनाही त्यांच्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे देता आली नाही. पोलिसांना कारची तपासणी केली असता त्यात देशीदारूचे 13 बॉक्स आढळून आले. सदर बॉक्स हिंगोली येथून आणण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांना कार तसेच देशीदारूचे बॉक्स असा 5.57 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी जमादार कोकरे यांच्या तक्रारीवरून कळमनुरी पोलिस ठाण्यात करण व्हडगिर, संजय कुरील यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून जमादार शेळके पुढील तपास करीत आहेत.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks