घंटागाडीसाठी वार्षिक 600 रु. शुल्काचा घरपट्टीत समावेश:मनपा सर्वसाधारण सभेत बहुमताने ठराव मंजूर‎

0
240_177609183769dd02bd123be_img202604131430.jpg




शहरातील कचरा घंटागाडी सेवेसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवून प्रत्येक घराकडून वार्षिक ६०० रुपये शुल्क आकारणी मालमत्ता करात समाविष्ट करणे,महापालिका क्षेत्रातील बांधकामे आणि विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण न करणाऱ्या आणि कामाची गुणवत्ता न राखणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणे तसेच हद्दवाढ भागातील पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करण्याच्या ठरावास महापालिकेच्या सोमवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. कचरा घंटागाडी सेवेसाठी प्रत्येक घराकडून वार्षिक ६०० रुपये शुल्क मालमत्ता करात आकारणीला विरोधी गटाच्या नगरसेवकांनी विरोध दर्शवला मात्र, हा ठराव सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर मंजूर केला. महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सोमवारी दोन विशेष सर्वसाधारण सभा एकापाठोपाठ पार पडल्या. महापौर शारदा खेडकर अध्यक्षस्थानी होत्या. व्यासपीठावर उपमहापौर अमोल गोगे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, सचिव अमोल डोईफोडे उपस्थित होते. कचरा घंटागाडी सेवेसाठी प्रत्येक घराकडून वार्षिक ६०० रुपये शुल्क मालमत्ता करात आकारणीचे सत्ताधारी शहर सुधार आाघाडीचे नगरसेवक सुनील मेश्राम, हरीश आलीमचंदानी, जयंत मसने, उषा विरक, अनिल गरड, उर्वरित पान ४

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks