राजधानी एक्सप्रेसमधून 4.26 कोटींचे कोकेन जप्त:महिलेला अटक, नागपुरात DRI ची कारवाई; शॅम्पूच्या बाटल्यांतून सुरू होती तस्करी

0
new-project-84_1776097186.gif




राजधानी एक्सप्रेसमधून चाललेल्या एका मोठ्या ड्रग्ज तस्करीचा महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) पर्दाफाश केला आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर केलेल्या या कारवाईत एका महिला प्रवाशाकडून तब्बल ८५३ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या अमली पदार्थाची किंमत सुमारे ४.२६ कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेला अटक करण्यात आली असून तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ‘डीआरआय’च्या नागपूर प्रादेशिक युनिटला एका महिला प्रवाशाकडून अंमली पदार्थांची खेप नेली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार, १२ एप्रिल २०२६ रोजी हजरत निजामुद्दीन–केएसआर बेंगळुरू राजधानी एक्सप्रेस नागपूर स्थानकावर पोहोचताच डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. संशयित महिलेची ओळख पटल्यानंतर तिला पुढील चौकशीसाठी अजनी रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आले. तस्करीची अनोखी शक्कल, शॅम्पूच्या बाटलीत कॅप्सूल महिलेच्या सामानाची झडती घेतली असता, तिच्या बॅगेत शॅम्पूच्या दोन बाटल्या आढळल्या. या बाटल्यांचे वजन सामान्यपेक्षा जास्त असल्याने अधिकाऱ्यांचा संशय बळावला. बाटल्या उघडल्या असता, त्यातील शॅम्पूच्या द्रावणाखाली ५० पिवळ्या रंगाच्या सीलबंद कॅप्सूल लपवल्याचे दिसून आले. या कॅप्सूल फोडल्या असता त्यात पांढरी पावडर सापडली. अंमली पदार्थ चाचणी कीटद्वारे (Drug Test Kit) तपासणी केली असता, हा पांढरा पदार्थ ‘कोकेन’ असल्याचे स्पष्ट झाले. आंतरराज्यीय रॅकेटची शक्यता सुरक्षा यंत्रणांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी शॅम्पूच्या बाटलीत कॅप्सूल लपवण्याची ही पद्धत अत्यंत चाणाक्षपणे आखण्यात आली होती. मात्र, डीआरआयच्या सतर्कतेमुळे हा डाव फसला. प्राथमिक तपासानुसार, ही महिला एका मोठ्या आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटचा भाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही खेप नक्की कुठून आणली गेली, तिचा मुख्य पुरवठादार कोण आहे आणि हे ड्रग्ज कोणाला पोहोचवले जाणार होते, या दिशेने डीआरआय आता सखोल तपास करत आहे. हे ही वाचा… भोंदू अशोक खरात प्रकरण:प्रतिभा चाकणकरांची 8 तास चौकशी; ‘समता’मधील कोट्यवधींचे व्यवहार अन् सह्या बनावट असल्याचा दावा नाशिकच्या गाजलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास आता थेट राजकीय वर्तुळातील नातेसंबंधांपर्यंत पोहोचला असून, या प्रकरणातील चौकशीचा फास अधिक घट्ट होताना दिसत आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांची सोमवारी शिर्डी पोलिस ठाण्यात तब्बल ८ तास चौकशी करण्यात आली. समता पतसंस्थेतील कोट्यवधींच्या संशयास्पद व्यवहाराप्रकरणी ही चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान प्रतिभा चाकणकर यांनी धक्कादायक खुलासा करत, पतसंस्थेतील ती खाती बनावट असून सर्व सह्या खोट्या असल्याचा दावा केला आहे. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed