Indiranagar, Rane Nagar Tunnel Deadline Extended to December 2026
![]()
कायम वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील इंदिरानगर आणि राणेनगर बोगद्यांच्या कामांची डेडलाईन 21 जुलै असली तरीही केवळ वाहतूक कोंडी आणि काम करण्यासाठी येत असलेल्या अडचणींमुळे हाबोगदा खुला होण्यासाठी डिसेंबर 2026 उजाडणार असल्याचे अधि
.
कुंभमेळ्याच्या निमित्ताने राष्ट्रीय महामार्गावरील द्वारका सर्कल, इंदिरानगर आणि राणेनगर बोगदा या अंडरपासची कामे काही दिवसांपासून सुरू आहेत. ही कामे कुठल्याही स्थितीत सिंहस्थापूर्वीच पूर्ण करण्यासाठी सत्ताधारी स्थानिक मंत्री आणि आमदारांमध्ये राजकारणही पेटले होते. सिंहस्थापूर्वी कामे होणार नसतील तर ती आता करुच नये, यावरुनही वाद झाला होता. त्यानुसार शासकीय यंत्रणांनी कामांना गती दिली. इंदिरानगर, राणेनगर येथील दोन्ही बोगदे हे 21 जुलैपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाईन निश्चित झाली आहे. त्यानुसार ही कामे गतीने केली जात असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. या दोन्ही बोगद्यांसाठी 25.91 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे संपूर्ण निधीही उपलब्ध झाल्याने कामे गतीने होण्यास मदत होत आहे.
सिंहस्थापूर्वीच दोन्हीबोगद्यांचे काम होणार
21 जुलै 2026 ही प्रकल्पाची डेडलाईन आहे. परंतु, तेथील वाहतूक, शहरातील ठिकाण, कामामध्ये येत असलेल्या अडचणी या सर्व बाबी पाहता अन् जुलैनंतर पाऊस राहाणार असल्याने या कामाला डेडलाईननंतरही 2 ते 3 महिने विलंब लागण्याचीही शक्यता आहे. परंतु, डिसेंबर 2026 म्हणजे सिंहस्थापूर्वीच ती पूर्ण होतील. – श्रीकांत ढगे, उपमहाव्यवस्थापक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नाशिक
अधिकारी म्हणतात, जुलैनंतर पावसामुळेही लागेल वेळ
नसतील तर ती आता करुच नये, यावरुनही वाद झाला होता. त्यानुसार शासकीय यंत्रणांनी कामांना गती दिली. इंदिरानगर, राणेनगर येथील दोन्ही बोगदे हे 21 जुलैपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाईन निश्चित झाली आहे. त्यानुसार ही कामे गतीने केली जात असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. या दोन्ही बोगद्यांसाठी 25.91 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे संपूर्ण निधीही उपलब्ध झाल्याने कामे गतीने होण्यास मदत होत आहे.
सध्या मात्र एका बाजूने वळसा घालूनच वाहतूक
जोपर्यंतबोगदा दोन्ही बाजूने पूर्ण क्षमतेने सुरू होत नाही तोपर्यंत आरडी सर्कलकडून इंदिरानगरकडे जाणाऱ्या वाहनांना वळसा घालूनच जावे लागणार आहे. तर द्वारका सर्कलचे काम सुरू असल्याने नाशिकरोडहून अनेक वाहने डीजीपीनगरमधून शिरुनबोगदामार्गेच शहरात प्रवेश करत आहेत. त्यांनाही कोंडीचा सामना करावा लागतो आहे.
