दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागातील १५ खाद्य आस्थापनांची तपासणी केली. या कारवाईत ३,१९६.२ किलो खाद्यपदार्थ जप्त केले. त्यापैकी १,४४०.५ किलो पदार्थ जागेवरच नष्ट केले. नष्ट केलेल्या पदार्थांची किंमत ४ लाख ३५ हजार २०० रुपये आहे. जप्त केलेल्या साठ्याची एकूण किंमत १६ लाख ९३ हजार २९५ रुपये आहे. आठ आस्थापनांचे परवाने निलंबित केले, तर तीन आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले. ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत ३ नोव्हेंबरला पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत तपासणी झाली. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने ही मोहीम सुरू आहे. मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, फरसाण आणि इतर खाद्यपदार्थांची विक्री व उत्पादन करणाऱ्या आस्थापनांची तपासणी करण्यात आली. काही ठिकाणी अस्वच्छता, अयोग्य साठवणूक, खाद्यरंगाच्या वापरातील त्रुटी, चुकीचे लेबलिंग आणि वैध अन्नपरवाना नसल्याचे आढळले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सर्वाधिक कारवाई झाली. कॅम्पमधील कराची स्वीट मार्टमधून १८६ किलो मोतीचूर लाडू, खवा आणि मलाई पेढा जप्त केला. शिक्रापूर येथील श्री गणेश लाडूवाले यांच्याकडील ६०५ किलो मिठाई अस्वच्छ परिस्थितीत तयार केल्याने जप्त करून नष्ट केली. मंचर येथील राजमिलन स्वीट्समधील २५० किलो मीठा मावा आणि मोहम्मदवाडीतील बिकानेर मिठाईवाल्यांकडील २६८ किलो बर्फीही नष्ट केली. पिंपळे सौदागर, काळेवाडी, वानवडी आणि मुळशी परिसरातील मिठाई व दुग्धजन्य पदार्थ विक्रेत्यांवरही कारवाई झाली. सांगलीतील आशिष ट्रेडर्सकडून ७४९ किलो बदाम जप्त केले. सोलापूरमधील जस राज स्वीट्स, सांगलीतील न्यू बालाजी बेकर्स आणि श्री सिरवी बंधू मिठाईवाले, तसेच कोल्हापुरातील विनायक ट्रेडिंग यांच्याकडील खाद्यपदार्थांचाही जप्त साठ्यात समावेश आहे. अन्न व्यावसायिकांनी वैध परवाना घेणे, स्वच्छता राखणे, खाद्यपदार्थ योग्य प्रकारे साठवणे व हाताळणे आणि लेबलिंगसह अन्नसुरक्षा नियम पाळणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने सांगितले. नियम मोडणाऱ्यांवर पुढेही कारवाई सुरू राहणार आहे. ————- हेही वाचा.. पायल झांबरे मृत्यूप्रकरणी सासू-सासऱ्यांना अटक: पती अक्षय आधीच पोलिस कोठडीत; हुंडा, पैसे अन् सोन्यासाठी छळाचा आरोप
आयटी अभियंता पायल झांबरे यांच्या मृत्यूप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी त्यांच्या सासू आणि सासऱ्यांना बुधवारी सकाळी अटक केली. रुग्णालयातून उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात येताच पोलिसांनी ताब्यात घेऊन ही कारवाई केली. पायल यांचे पती अक्षय अरविंद झांबरे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. सविस्तर वाचा

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search