हिंगोली जिल्ह्यात राजकारण करताना संघर्ष हा आलाच, मात्र त्यांची संघर्ष क्षमता संपल्यानेच माजी आमदार डॉ. संतोष टारफे, जिल्हा प्रमुख अजय सावंत यांनी पक्ष सोडला अशी टिका ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी बुधवारी ता. ४ समाज माध्यमांशी बोलताना केली आहे. हिंगोली जिल्हयात माजी आमदार डॉ. टारफे, जिल्हाप्रमुख अजय सावंत यांच्यासह कळमनुरी तालुक्यातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. या प्रवेशानंतर गटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी समाज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी गणेश शिंदे, प्रविण महाजन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पक्ष सोडणारे दोघेही अस्वस्थ होते यावेळी देशमुख म्हणाले की, पक्ष सोडणारे दोघेही अस्वस्थ होते. त्यांना कामे घ्यायची होती त्यांना गुत्तेदारी करायची होती त्यासाठी ते पक्ष सोडणार याची यापुर्वीच कल्पना होती. त्या संदर्भात आम्ही पक्ष नेतृत्वाला माहिती देखील दिली होती. खरेतर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पक्ष सोडला त्यावेळीच हे दोघेही पक्ष सोडतील हे स्पष्ट दिसू लागले होते. मात्र हिंगोली जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पक्षातील एक दोन पदाधिकारी गेल्याने पक्षाला काहीही फरक पडणार नाही. या उलट शिवसैनिक मोठ्या ताकदीने पक्षाचे काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेत फुट पडल्यानंतर सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत हिंगोलीची जागा पक्षाला मिळवून दिली. त्यानंतरच्या काही निवडणुका आम्ही जिंकलो अन काही निवडणुका हरलो देेखील आहोत मात्र खचून गेलेलो नाहीत. राजकारणात काम करताना चढउतार येत असतात. शिवसेना सोडणारे लाचार झाले त्यांनी इतर पक्षात प्रवेश करण्याऐवजी राजकारण सोडले असले तर योग्य झाले असले पण त्यांचा संघर्ष संपल्यामुळे त्यांनी लाचारी पत्करली असल्याचा आरोपही ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी केला आहे. हिंगोली जिल्हयातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून येणाऱ्य कार्यकाळात पक्षाला गतवैभव मिळवून दिल्या शिवाय शांत बसणार नाही असे देशमुख यांनी सांगितले. ————- हेही वाचा.. हिंगोलीत ठाकरे गटाला धक्का: माजी आमदार संतोष टारपे शिंदेंच्या शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले- बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेत आलात हिंगोली जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार संतोष टारपे आणि जिल्हाप्रमुख गोपू पाटील यांच्यासह अनेक जिल्हा परिषद सदस्य, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. आमदार संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व पदाधिकारी शिवसेनेत दाखल झाले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. सविस्तर वाचा What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 4 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation पुणे विभागात एफडीएची मोठी कारवाई:3.19 टन खाद्यपदार्थ जप्त, 1,440 किलो पदार्थ नष्ट, मिठाई-डेअरीसह 15 आस्थापनांची तपासणी; 8 परवाने निलंबित 35,000 कोटींचा चुराडा कुठे झाला?:गिरीश महाजनांच्या बगलबच्च्यांचा 7-8 हजारांचा घोटाळा बाहेर काढणार; रोहित पवारांचा इशारा