डॉ. दत्ता आंबेकर यांना पीएच.डी. पदवी

जनसंवाद व पत्रकारिता विषयात संशोधन पूर्ण; विविध स्तरांतून अभिनंदन

लातूर : शहरातील प्रसिद्ध वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. दत्ता सूर्यकांत आंबेकर यांनी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून जनसंवाद व पत्रकारिता या विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.

डॉ. आंबेकर यांनी प्रा. डॉ. दीपक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली “आरोग्य जनजागृतीत नवमाध्यमांची भूमिका” या विषयावर संशोधन प्रबंध सादर करून पीएच.डी. पदवी प्राप्त केली.

डॉ. दत्ता आंबेकर यांनी यापूर्वी बीएएमएस, एम.एस्सी. सायकॉलॉजी (सुवर्णपदक), एम.फिल., सेट, एमबीए (हॉस्पिटल मॅनेजमेंट), पीजीडीसीसीएच, पीजीडीएफएम तसेच न्यूट्रिशन अँड फिटनेस यांसारख्या विविध शैक्षणिक पात्रता संपादन केल्या आहेत.

त्यांनी शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि प्राध्यापक म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले आहे. सध्या ते आरोग्य, पोषण आणि मानसिक आरोग्य या क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत.

डॉ. दत्ता आंबेकर यांनी पीएच.डी. पदवी संपादन केल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या या यशाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

नांदेडलाईव्हकडून डॉ. दत्ता आंबेकर यांचे हार्दिक अभिनंदन!

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search