Donald Trump | युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्पचा नवा संदेश! होर्मुझ सामुद्रधुनीबाबत मोठी घोषणा
Donald Trump | अमेरिका (America) आणि इराण (Iran) यांच्यात ऐतिहासिक युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक अत्यंत महत्त्वाचा सकारात्मक संदेश दिला आहे.
पुढील दोन आठवड्यांसाठी हा शस्त्रसंधी कायम राहणार असून, होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) पुन्हा खुली करण्याच्या बदल्यात अमेरिका या सागरी मार्गावरील वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी इराणला थेट मदत करणार असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. युद्धाच्या सुरुवातीपासून इराणने या मार्गावर नाकेबंदी केली होती, मात्र आता ती उठवून जहाजांना सुरक्षित रस्ता देण्यास इराण तयार झाला आहे.
उद्ध्वस्त इराणच्या पुनर्बांधणीसाठी ट्रम्प यांचा दिलासा
गेल्या काही दिवसांतील भीषण युद्धामुळे इराणमधील तेहरान (Tehran) आणि कोम (Qom) यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये प्रचंड विध्वंस झाला आहे. अमेरिका आणि इस्रायल (Israel) यांच्या बॉम्बहल्ल्यात इराणचे शाळा, रुग्णालये, विद्यापीठे आणि सर्वात मोठा पूलही उद्ध्वस्त झाला होता. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी इराणला मोठा दिलासा दिला असून, आता तेथील पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे म्हटले आहे. इराणसाठी हा एक मोठा राजनैतिक विजय मानला जात असून, विनाशाच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी यामुळे मोठी मदत होणार आहे.
होर्मुझ कर आणि इराणच्या १० प्रमुख अटी
युद्धविरामाच्या अटींनुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या मालवाहू आणि तेलवाहू जहाजांकडून ‘टोल’ (Toll) म्हणजेच कर वसूल केला जाईल. या करातून जमा होणाऱ्या निधीचा वापर इराणमधील उद्ध्वस्त वास्तूंच्या पुनर्बांधणीसाठी केला जाणार आहे.
इराणवरील सर्व प्रकारची आक्रमकता थांबवणे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचेच नियंत्रण कायम राहणे.
युरेनियम संवर्धनाला (Uranium Enrichment) आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणे.
सर्व प्रकारचे जागतिक आणि दुय्यम निर्बंध पूर्णपणे हटवणे.
युएनएससी (UNSC) आणि आयएईए (IAEA) चे सर्व ठराव रद्द करणे.
युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणे.
अमेरिकेच्या लढाऊ सैन्याने या प्रदेशातून माघार घेणे.
लेबनॉनसह (Lebanon) सर्व आघाड्यांवरील शत्रुत्व कायमचे संपवणे.
शस्त्रसंधीबाबत ट्रम्प यांचे अधिकृत वक्तव्य
डोनाल्ड ट्रम्प यांनी या द्विपक्षीय युद्धविरामाची घोषणा करताना पाकिस्तान (Pakistan) आणि शहबाज मुनीर (Shahbaz Munir) यांच्या मध्यस्थीचा उल्लेख केला. ते म्हणाले की, इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्यास मान्यता दिली आहे, जो शांततेच्या दिशेने एक मोठा बदल आहे. इराणने दिलेला १०-कलमी प्रस्ताव वाटाघाटीसाठी एक व्यवहार्य आधार असून, भूतकाळातील जवळपास सर्व वादग्रस्त मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये एकमत झाले असल्याचेही ट्रम्प यांनी आवर्जून सांगितले. या दोन आठवड्यांच्या काळात दोन्ही देश कायमस्वरूपी शांतता करारावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
