विधान परिषद निवडणूक:मविआकडून अंबादास दानवेंचा अर्ज; भाजपचे 6 उमेदवार, NCPकडून सिद्दीकी, शिवसेनेकडून गोऱ्हे-कडूंची उमेदवारी दाखल

0
15_1777543128.gif




महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. पक्षांनी आपले उमेदवार निश्चित केले आहेत. शिवसेना (शिंदे गट) कडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून झिशान सिद्दीकी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच भाजपच्या सहा उमेदवारांनीही आपले अर्ज दाखल केले आहे. महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे अंबादास दानवे हेच उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांच्या उमेदवारीला काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आघाडीतील तिढा काही सुटल्याचे चित्र आहे. दरम्यान, उमेदवारी निश्चिती आणि अर्ज प्रक्रियेनंतर आता निवडणुकीतील पुढील टप्प्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed