कृउबात आठ हजार क्विंटल तुरीची आवक:मंगळवारी सर्वाधिक आवक; शनिवारी मिळाला सर्वाधिक 8270 रुपये दर
![]()
जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी तुरीचे पीक काढले असून महिनाभरापासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक होत आहे. मंगळवारी येथील बाजार समितीत २२०० क्विंटल तुरीची आवक झाली. यात शेतकऱ्यांना क्विंटल मागे कमीतकमी सात हजार रुपये तर जास्तीत जास्त ८०९५ दर मिळाला. तर सरासरी ८०६० रुपयांचा दर मिळाला आहे. गत सहा दिवसात अकोला बाजार समितीत आठ हजार क्विंटल तुरीची आवक झाली आहे. सोमवारी बाजार समितीत १३०९ क्विंटल तुरीची आवक झाली. शेतकऱ्यांच्या तुरीला क्विंटल मागे सरासरी ८२५५ रुपये दर मिळाला. कमीतकमी सात हजार रुपये तर जास्तीत-जास्त आठ हजार रुपयांचा दर मिळाला आहे. अकोला बाजार समितीत शनिवारी शेतकऱ्यांनी सुमारे १६७४ क्विंटल तूर विक्रीसाठी आणली. शेतकऱ्यांना क्विंटल मागे कमीतकमी सात हजार रुपये तर जास्तीत जास्त ८३५० रुपयांचा दर मिळाला. तर क्विंटल मागे सरासरी ८२७० रुपयांचा दर मिळाला आहे. तर ३ एप्रिल रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी १२४५ क्विंटल तूर विक्रीसाठी आणली. दरात चढ- उतार शुक्रवारी क्विंटल मागे शेतकऱ्यांना ६५०० ते ८४५५ रुपयांचा दर मिळाला तर सरासरी ८२०० रुपयांचा दर मिळाला आहे. तसेच बुधवारी (दि.१) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १५८१ क्विंटल तूर विक्रीसाठी आणली. यावेळी तुरीला कमीतकमी सात हजार रुपये तर जास्तीत-जास्त ८२३५ रुपयांचा दर मिळाला. तर क्विंटल मागे सरासरी ८१५० रुपयांचा दर मिळाला आहे. तालुका क्षेत्र (हेक्टर) अकोट ५१५० तेल्हारा ६१०० बाळापूर ११४०३ पातूर ५६४० अकोला १०९०० बार्शीटाकळी ९३०० मूर्तिजापूर ११२६९ एकूण ५९,७६२ {गेल्या सहा दिवसात अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत आठ हजार क्विंटल तुरीची आवक झाली. जिल्ह्यातील तुरीचे एकूण क्षेत्र अधिक पेरणीमुळे आवक सुरू ^बाजार समितीत मंगळवारी २२०० क्विंटल तूर आली. शेतकऱ्यांना क्विंटल मागे सरासरी ८०६० रुपयांचा दर मिळाला आहे. जिल्ह्यात यावर्षी एकूण क्षेत्राच्या सरासरी ९९ टक्के क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाले असून अजूनही बाजार समितीत आवक सुरू आहे. – सुनील मालोकार, सचिव, बाजार समिती, अकोला.
