सिलिंडर पुरवठ्याची स्थिती सामान्य; तर लोक रांगेत का?:वंचितचा सवाल; जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे दिले निवेदन‎

0
240_177548371869d3bb469c2d3_06gascclende.jpg




गॅस पुरवठ्यावरून केंद्र सरकार, राज्य सरकार म्हणत आहे की, परिस्थिती सर्वसामान्य आहे. मग सांगा अद्यापही नागरिक गॅस सिलेंडरसाठी रांगेत का उभे आहेत, असा सवाल वंचितने जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर केलेल्या निवेदनात केला आहे. आपण आपल्या एसी ऑफिसमधून बाहेर पडावे आणि बाहेरील परिस्थिती बघावी. अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरचा काळा बाजार होत आहे. सिलिंडर ५ ते ७ हजार रूपयांचा मिळत आहे. त्यामुळे कोणतेही संकट नाही, असा सरकारकडून होणारा दावा खोटा आहे, अशा शब्दात वंचितने सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. गत कही दिवसांपासून अमेरिका व इस्त्रायलने इराणवर हल्ला केला असून, आखाती देशांमध्ये युद्ध छेडले आहे. याचा परिणाम गॅस पुरवठ्यावर आहे. गॅस सिलिंडर मिळण्यासाठी नागरिक गॅस एजन्सी बाहेर रांग लावत आहेत. ऑनलाईन बुकींग होत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. अनेक कुटुंब गॅस मिळत नसल्याने शहर सोडत आहे कामधंदे सोडून तासंतास गॅस मिळण्याकरिता गॅस एजन्सी समोर उभे राहावे लागत आहेत. दरम्यान ६ एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीने चूल मांडो आंदोलन करीत अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या करण्यात आल्या मागण्या वंचितने निवेदनातून पुढील मागण्या केल्या. गॅस सिलिंडरसाठी होणारी कृत्रिम टंचाई थांबवावी. गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखावा. संबंधितांंवर कठोर कारवाई करा. २५ दिवसानंतर गॅस मिळेल, ही अट शिथिल करण्यात यावी. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून कम्युनिटी किचन सुरू करावेत. सरकारकडून प्रत्येक २ किलोमीटरवर जेवणाची व्यवस्था करून गरजू लोकांना अन्न देण्यात यावे. अनेक ठिकाणी केवायसी होत नसल्याने सिलिंडर देण्यात नाही. त्यामुळे अशा ग्राहकांना तातडीने गॅस देण्यात यावा. जिल्ह्यामध्ये उज्वला गॅस योजनेअंतर्गत किती लोकांना गॅस सिलेंडर दिले आहेत, याची माहिती देण्यात यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed