Toll New Rules India | वाहनधारकांनो लक्ष द्या! 10 एप्रिलपासून FASTag संदर्भात नवीन नियम लागू

0
Toll-Rules-2025.webp.webp


Toll New Rules India | हायवेवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. देशातील टोल वसुली व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला असून 10 एप्रिलपासून टोल नाक्यांवर रोख रक्कम स्वीकारणे पूर्णपणे बंद केले जाणार आहे. हा निर्णय National Highways Authority of India (NHAI) ने घेतला असून टोल वसुली पूर्णपणे डिजिटल करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे वाहनधारकांना आता टोल भरण्यासाठी डिजिटल पद्धतीचाच वापर करावा लागणार आहे.

या निर्णयानंतर टोल प्लाझावर प्रामुख्याने FASTag द्वारे टोल भरता येणार आहे. जर एखाद्या वाहनात फास्टॅग नसेल किंवा तो कार्यरत नसेल, तर चालकाला Unified Payments Interface (UPI) च्या माध्यमातून टोलची रक्कम भरावी लागेल. या बदलामुळे टोल प्लाझांवरील रांगा कमी होतील आणि महामार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.

नवीन नियमांनुसार वाहनात सक्रिय फास्टॅग नसेल, तर चालकाला यूपीआयद्वारे टोल भरावा लागेल. मात्र यासाठी सामान्य शुल्कापेक्षा सुमारे 25 टक्के अधिक रक्कम आकारली जाईल. त्यामुळे नियमित महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी फास्टॅग हा सर्वात सोपा आणि स्वस्त पर्याय मानला जात आहे. (Toll New Rules India)

याशिवाय जर एखाद्या चालकाने फास्टॅग किंवा यूपीआय या दोन्ही पद्धतींनी टोल भरण्यास नकार दिला, तर टोल कर्मचारी त्या वाहनाला पुढे जाण्यापासून रोखू शकतात. अशा परिस्थितीत संबंधित वाहनधारकाला ई-नोटीसही पाठवली जाऊ शकते. नोटीस मिळाल्यानंतर तीन दिवसांत रक्कम भरली नाही, तर टोलची रक्कम दुप्पट करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.

Toll New Rules India | ओळखपत्र दाखवून टोल सूट मिळणार नाही :

या निर्णयासोबतच आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. यापुढे खासगी वाहनांमध्ये सरकारी ओळखपत्र दाखवून टोलमधून सूट घेण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. आता फक्त अधिकृतरीत्या टोलमधून सूट देण्यात आलेल्या वाहनांनाच टोल न देता पुढे जाण्याची परवानगी दिली जाईल.

या बदलामुळे टोल सवलतीचा गैरवापर थांबेल आणि टोल प्लाझांवर होणारे वाद कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशातील टोल वसुली प्रणाली अधिक पारदर्शक आणि जलद होण्याची शक्यता आहे.

News Title: No Cash at Toll from April 10: Without FASTag Pay 25% Extra via UPI on Highways

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed