धमक्यांना घाबरून राजकारण होत नाही,जे घाबरतात त्यांनी भाजपचे गुलाम व्हावे:भाजपच्या धमक्यांना आम्ही भीत नाही- संजय राऊत

0
new-project-2026-04-07t105400396_1775539434.jpg




निवडणूक लढवू नका असे काही समजून सांगितले जात नाही, धमकी दिली जाते. साखर कारखाना, बँकेचे व्यवहार, सहकारी संस्था याबाबत कोणी समजून सांगत नाही. यात कोणते क्रांतीकारी काम आहे समजून सांगण्याचे? प्राजक्त तनपुरेंना समजून सांगायला रवींद्र चव्हाण आणि विखे पाटील गेले ते किती मोठे क्रांतीकारक आहेत? ते काय सेनानी आहेत का? तनपुरे काय महान सामाजिक कार्यकर्ते आहेत का? असा सवाल उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, रवींद्र चव्हाण यांच्यावर निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप आहे. तर विखे पाटील यांचे जमीनीचे काही तरी प्रकरण आताच समोर आले आहे. हे काय समजून सांगणार. ही लोकं फाइल्स घेऊन जातात, माघार घ्या नाहीतर हे आमच्याकडे आहे अशा धमक्या देण्यासाठी ते जातात. कारखान्याला नोटीस देऊ, जे घाबरतात ते मागे जातात. सहज काही मिळत नसते धमक्यांना घाबरून राजकारण होत नसते. जे घाबरतात त्यांनी भाजपचे गुलाम आहोत असे मान्य करावे. आम्हाला हे मान्य नाही आम्ही भाजपला घाबरत नाही, देशात लोकशाही सुरू आहे. तेव्हा तुम्ही पिंपरीची निवडणूक लढवली होती संजय राऊत म्हणाले की, बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार दिला यावर शरद पवारांनी व्यक्त केलेल्या मताशी मी सहमत आहे. शरद पवारांनी काँग्रेसच्या स्थापनेपासून त्यांच्यासोबत काम केले आहे. पक्ष जराी सोडला तरी त्यांची विचारधारा काँग्रेसची आहे. त्यांनी त्यांचे राजकारण काँग्रेसच सोबतच केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कौटुंबिक कारणामुळे ती जागा लढत नसल्याने काँग्रेसला ती जागा लढण्याचा अधिकार आहे.याचा अर्थ दुसरे कोणी लढू नये ही भूमिका ठेवता येत नाही. लोकशाहीमध्ये निवडणूक लढवू नको म्हणून दबाव का आणायचा.पार्थ पवारांच्या वडीलांनी पिंपरी चिंचवड निवडणूक लढवलीच होती लक्ष्मण पवारांच्या निधनानंतर. काँग्रेसच्या मदतीने ते ती निवडणूक लढले होते, याची आठवण राऊतांनी करूण दिली. मुख्यमंत्र्यांना जाग आली आहे का? संजय राऊत म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासाची संघर्षगाथा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी आणि त्यातून सातत्याने प्रेरणा मिळत रहावी यासाठी उद्धव ठाकरेंच्या प्रेरणेतून संयुक्त राष्ट्र दालनाची निर्मिती झाली. त्या दालनाचे उद्घाटन बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. भाजपच्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये त्या दालन तुटले, त्यांचे नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांना त्याकडे लक्ष द्यावे असे वाटले नाही हे 106 हुतात्माचे दुर्दैव आहे. मराठी माणसासाठी शिवसेनेने बरेच काही केले, पण तुमच्या काळात इतिहास सडवण्याचे काम सुरू आहे. मनपाच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर गेल्या त्यांनी त्याची परिस्थिती दाखवली. यानंतर तरी मनपाना आणि मुख्यमंत्र्यांना जाग आली आहे का? असा सवाल राऊतांनी केला आहे. जय महाराष्ट्र म्हणायचा अधिकार नाही संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ एकडे तिकडे फिरत असते. अनेक प्रकल्पावर घोषणा करत असते, त्यांनी संयुक्त राष्ट्र दालनाची अवस्था स्वत: जाऊन बघावी आणि ती सुधारावी असे जर मुख्यमंत्र्यांना वाटत नसेल तर त्यांचे महाराष्ट्र प्रेम बेगडी आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे, असेही राऊतांनी म्हटले आहे. मनपाला काय भीक लागली आहे का? शिवसेनेच्या कार्यकाळात मनपाच्या 90 हजार कोटी रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या, त्या मोडून मोडून तुम्ही खात आहात. हजार कोटी रुपयांची कंत्राटे रद्द केली. पण हे सर्व सुरू असताना सर्वांना संयुक्त महाराष्ट्र भवनाचा विसर पडला आहे. का जय महाराष्ट्र म्हणता तुम्हाला तो अधिकार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed