बसच्या स्मार्ट कार्डसाठी कोंडी; पैठणला ७००० ज्येष्ठ नागरिकांसाठी एकच केंद्र:नवीन कार्डासाठी १९९ रुपये, तर जुने कार्ड बदलण्यासाठी १४९ रुपये खर्च
![]()
रमेश शेळके | पैठण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ स्मार्ट कार्ड योजना लागू केली आहे. ज्येष्ठ नागरिकांसह महिला, विद्यार्थी, दिव्यांग प्रवाशांसाठी हे कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. कार्ड आधार संलग्न आहे. नवीन कार्डासाठी जीएसटीसह शुल्क १९९ रुपये आहे. जुने कार्ड बदलून नवीन स्मार्ट कार्ड घेणाऱ्यांसाठी १४९ रुपये खर्च निश्चित केला आहे. राज्यभरातील बसस्थानके आणि ३ हजारांहून अधिक अधिकृत एजंट्समार्फत नोंदणी सुरू आहे. पैठण एसटी स्थानकातही यासाठी एक कक्ष तयार केला आहे. येथे १९९ ऐवजी ३०० रुपये आकारले जात असल्याचा आरोप आहे. या स्मार्ट कार्डमुळे सवलतीचा प्रवास अधिक पारदर्शक, सुलभ होणार आहे. ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा याच कार्डद्वारे मिळणार आहे. इतर वयोगटांनाही सवलतीचा लाभ डिजिटल पद्धतीने मिळेल. हे कार्ड प्रीपेड वॉलेटप्रमाणे काम करणार आहे. प्रवासी रिचार्ज करून तिकीट व्यवहार करू लूट थांबवा, अन्यथा धडा शिकवू ः राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितू परदेशी, बजरंग लिंबोरे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांना अडवून ठेवू नका. कार्डसाठीचे अडथळे दूर करा. केंद्र वाढवा, कोणत्याही प्रकारची लूट करू नका, अन्यथा आमच्या स्टाइलने धडा शिकवला जाईल, असे त्यांनी सांगितले. तक्रार करा, कारवाई करू ः आगारप्रमुख मडके आगारप्रमुख गजानन मडके यांनी स्मार्ट कार्ड आवश्यक असल्याचे सांगितले. दर १९९ रुपये असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र ३०० रुपये घेतले जात असल्याच्या तक्रारीवर ते म्हणाले, लूट होत असेल तर कारवाई करू, यासाठी ज्येष्ठांनी तक्रार करावी. तत्काळ कारवाई केली जाईल. पैठण बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांची होत असलेली गर्दी. शकतील. रोख व्यवहार कमी होणार आहे. वेळेची बचत होणार आहे. पैठण तालुक्यात साधारण ७ ते ९ हजार ज्येष्ठ नागरिक एसटीने प्रवास करतात. या सर्वांना कार्ड आवश्यक आहे. तालुक्यात कार्डसाठी एकच केंद्र आहे. येथे दररोज केवळ १०० ज्येष्ठांची नोंद असल्याने अनेकांना परत जावे लागते. प्रत्येक मोठ्या सर्कलमध्ये कार्ड सेंटर सुरू करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिक संघटनेने केली आहे. नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. वयाचा पुरावा आवश्यक असून आधार किंवा पॅन कार्ड व फोटोही आवश्यक आहे.
