जिल्हा परिषद प्रा. शाळा दत्तावाडीचे दीपक बावस्कर यांना शिक्षक पुरस्कार:राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन
![]()
प्रतिनिधी | फर्दापूर जिल्हा परिषद शाळा दत्तावाडी (ता.सोयगाव) येथील शिक्षक दीपक बावस्कर यांना.ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. मान्यवरांच्या उपस्थित पुणे येथील निगडी येथे देण्यात आला आहे. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. पुणे येथील ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीने राज्यभरातील शाळांमधे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जितो. फर्दापूर येथील शिक्षक दीपक बावस्कर हे गेल्या अनेक वर्षांपासून जि. प. शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी या काळात सोयगाव तालुक्यातील फर्दापूरतांडा येथे शैक्षणिक क्रांती घडवली आहे. आपल्या सेवाकाळात लोकसहभागातून शाळेच्या भौतिक सुविधांत सुधारणा केली आणि विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कार्याची दखल घेत पुणे येथील सामाजिक ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थेने त्यांना या वर्षाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिला आहे. हा पुरस्कार पुणे येथे दत्तात्रय वारे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व मानपत्र दिले.
