कंकराळात विहिरीत पिकअप कोसळला:हॅँडब्रेक लावले नसल्याने घटना, जीवितहानी नाही
![]()
प्रतिनिधी | सोयगाव उभ्या पिकअपला हॅँडब्रेक लावलेले नसल्याने तो उताराने पुढे जाऊन विहिरीत कोसळल्याची घटना कंकराळा (ता. सोयगाव) स्मशानभूमीजवळ रविवारी दुपारी घडली. सुदैवाने पिकअपमध्ये कुणी नसल्याने जीवितहानी टळली. पाचोरा येथे गव्हाची विक्री करण्यासाठी चालकाने एका शेतकऱ्याचा गहू पिकअपमध्ये भरला होता. दरम्यान, शेतकऱ्याला बोलावण्यासाठी चालक खाली उतरून शेतकऱ्याच्या घरात गेला. या वेळी तो हॅँडब्रेक लावण्याचे विसरला. याच वेळी उताराने पिकअप पुढे जाऊन ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाण्याच्या कठडे नसलेल्या विहिरीत कोसळला. क्रेनच्या मदतीने नंतर वाहन विहिरीतून बाहेर काढले. कंकराळा ग्रामपंचायतीने गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ही विहीर बांधली. शासकीय योजनेतून खर्च झाला होता तरीही विहिरीला कठडे बांधले नाहीत. त्यामुळे ही विहीर अपघाताला निमंत्रण देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
