गाजगाव येथील काळवणे यांचा जिल्हा बँकेच्या मतदानासाठी ठराव:एकमताने बिनविरोध निवड
![]()
प्रतिनिधी | लासुर स्टेशन गाजगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाकडून नुकतेच जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी येथील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष उत्तमराव काळवणे यांच्या नावाचा एकमताने ठराव देण्यात आला. दरम्यान गाजगाव येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत चेअरमन आणि व्हाईस चेअरमनसह सर्व संचालक मंडळाने संतोषराव काळवणे यांच्या नावाचा जिल्हा बँकेसाठी ठरावाची एकमताने बिनविरोध निवड केली. माजी सरपंच कडुबा हिवाळे, बाजीराव काळवणे, देविदास गवळी, अशोक पाटेकर, सतीष हिवाळे, पोलिस पाटील सुरेश संगेकर, विनायकराव भोसले, फकीरचद ठोंबरे, कौसेसह ग्रामस्थ उपस्थित होते.
