[ads1]
जुन्या वादातून सूड आणि हत्याकांड
मिळालेल्या माहितीनुसार, मृत नरेश पवार याच्या आईला दोन वर्षांपूर्वी संशयितांपैकी एकाने पळवून नेल्याच्या कारणावरून दोन्ही कुटुंबांत तीव्र वैमनस्य निर्माण झाले होते. या जुन्या रागाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी पूर्वगामी कट रचून नरेशवर हल्ला केला. २५ सप्टेंबर रोजी रात्री ९:४५ च्या सुमारास कौठा येथील बसवेश्वरनगर भागात नरेश पवार याला गाठून आरोपींनी धारदार खंजिराने त्याच्या डोक्यावर, मानावर आणि छातीवर सपासप वार केले. यात गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झालेला नरेश जागीच कोसळला.
रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व मित्रांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी अवस्थेतील नरेशला शासकीय रुग्णालय, विष्णुपुरी येथे उपचारासाठी दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी मृत तरुणाचे वडील बालाजी किशनराव पवार (वय ६०, रा. भाग्यश्री सोसायटी, वासरणी, नांदेड) यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलिसांनी राधेश्याम उर्फ लिब्या प्रल्हाद गोंडवड, गजानन घनश्याम गोंडवड, रामेश्वर रमेश गोंडवड आणि अभिषेक प्रल्हाद गोंडवड यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १०३(१) (खून), कलम ३(५) (समान उद्देश) आणि शस्त्र अधिनियम, १९५९ च्या कलम ४ व २५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस तपास सुरू
प्रथम खबर अहवाल एफआयआर क्रमांक १२५६/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन,पोलीस उप अधीक्षक प्रशांत शिंदे, पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भोसले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.प्राप्त माहितीनुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने हे सर्व खूनी गजाआड केले आहेत.
[ads2]
















Leave a Reply