[ads1]
![]()
पुणे महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सव २०२६च्या कालावधीत करण्यात आलेल्या नियोजनाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. शहरातील नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या विसर्जन सुविधांचा वापर करत एकूण ६ लाख ७७ हजार ५७ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये बांधलेल्या हौदांमध्ये १ लाख ९ हजार ४७९, लोखंडी टाक्यांमध्ये ३ लाख ९४ हजार ३४९, तर मूर्ती संकलन केंद्रांमार्फत १ लाख ७३ हजार २२९ गणेशमूर्ती संकलित करण्यात आल्या. गणेशोत्सवाच्या कालावधीत ७ लाख १५ हजार ५९ किलो निर्माल्य संकलित करण्यात आले. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून शहरातील विविध ठिकाणी निर्माल्य कलश व कंटेनरची व्यवस्था करण्यात आली होती. गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेने ३८ घाटांवर ५८ बांधलेले हौद, ३०५ ठिकाणी ८१२ लोखंडी टाक्या आणि २२४ मूर्ती संकलन केंद्रे उपलब्ध करून दिली होती. तसेच शाडू मातीच्या गणेशमूर्ती व शाडू माती संकलनासाठी ४५ ठिकाणी स्वतंत्र संकलन केंद्रे उभारण्यात आली होती. दरम्यान, गणेशोत्सवाच्या विसर्जनानंतर शहरातील सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, मोकळे भूखंड, नदीघाट, विसर्जन हौद आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या परिसरात स्वच्छतेचे काम सुरू आहे. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांची स्वच्छता करण्यासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त सफाई सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कृत्रिम हौदांच्या स्वच्छतेचे कामही सुरू आहे. ९.१८ लाख किलो कचºयाचे संकलन गणेशोत्सव कालावधीत १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून ९ लाख १८ हजार ५३७ किलो कचरा संकलित करण्यात आला. त्यामध्ये ५ लाख ४६ हजार ३५४ किलो ओला कचरा, ३ लाख ७२ हजार १८४ किलो सुका कचरा, १८ हजार ९१० किलो डेकोरेशन साहित्य आणि २ हजार १५३ किलो चपला-बूट यांचा समावेश आहे. ४,१७९ सफाई सेवकांची यंत्रणा गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी महापालिकेने १६ वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, १६१ आरोग्य निरीक्षक, २९२ मुकादम आणि ४,१७९ कायम सफाई सेवक यांच्यासह आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले होते. तसेच १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या मागणीनुसार आवश्यक नियोजनासाठी १,६७० वाहने उपलब्ध करून देण्यात आली होती. वाघोलीतील खाणीत मूर्तींचे पुनर्विसर्जन कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांमध्ये विसर्जित करण्यात आलेल्या गणेशमूर्तींचे पुनर्विसर्जन करण्यासाठी वाघोली येथील खाणीची व्यवस्था करण्यात आली होती. १५ क्षेत्रीय कार्यालयांतून संकलित करण्यात आलेल्या मूर्तींचे या ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने पुनर्विसर्जन करण्यात आले. सार्वजनिक स्वच्छतागृहेही मोफत गणेशोत्सवाच्या कालावधीत क्षेत्रीय कार्यालयांच्या अखत्यारीतील सार्वजनिक सशुल्क स्वच्छतागृहे नागरिक आणि पर्यटकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आली होती. संबंधित केअरटेकरना वापरकर्त्यांकडून शुल्क न आकारण्याचे आदेश देण्यात आले होते.
[ads2]
पुणे मनपाच्या सुविधांमध्ये 6.77 लाख गणेश मूर्तींचे विसर्जन:7.15 लाख किलो निर्माल्य संकलित; 38 घाटांवर 58 हौद, 812 टाक्या उपलब्ध
















Leave a Reply