गणेश विसर्जनाच्या दिवशी जालन्यात खून:5 हजारांच्या प्रोटीन पावडरवरून जिम ट्रेनरची निर्घृण हत्या, 2 आरोपींना अटक

[ads1]


जालना शहरात गणपती विसर्जनाच्या दिवशी एका जिम ट्रेनरची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. लोधी मोहल्ला भागात दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी जिम ट्रेनर राहुल राजपूत याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जिम ट्रेनरला स्थानिक नागरिक व पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, 5 हजार रुपयांच्या प्रोटीन पावडरवरून आरोपी आणि मृत राहुल राजपूत यांच्यात वाद झाला होता. याच वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी तत्परता दाखवत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मयत तरुण जखमी अवस्थेत जमिनीवर कोसळल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. शारीरिक व्याधीला कंटाळून लॉजवर आत्महत्या दुसऱ्या एका घटनेत, शारीरिक व्याधीमुळे त्रस्त असलेल्या एका व्यक्तीने लॉजवर सलाइनमध्ये विषारी औषध मिसळून आत्महत्या केल्याची घटना घडली. निवृत्ती भागुजी फरताडे (वय 36, रा. तुपेवाडी, ता. जालना) असे मयताचे नाव आहे. सततच्या शारीरिक व्याधीमुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्ती फरताडे हे पुण्याला जाण्यासाठी काल शहरात आले होते. मात्र, उशीर झाल्यामुळे ते बसस्थानक परिसरातील एका खासगी लॉजमध्ये थांबले होते. त्यांनी आतून दरवाजा बंद करून सलाइनच्या बाटलीत विषारी औषध टाकले आणि ती नसांमध्ये सोडून आत्महत्या केली. बराच वेळ दरवाजा उघडत नसल्याने लॉज चालक व काही नातेवाईकांनी 112 क्रमांकावर फोन करून माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. हे ही वृत्त वाचा

ठाणे हादरलं:गस्तीवर असताना पोलिस उपनिरीक्षकावर जीवघेणा हल्ला, मद्यपी गावगुंड अटकेत
ठाण्यात रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असताना गस्त घालणाऱ्या एका पोलिस उपनिरीक्षकाची गावगुंडाने धक्काबुक्की करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहरात पोलिस उपनिरीक्षक किसन भोईर रात्रीच्या सुमारास परिसरात नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. यादरम्यान परिसरातील काही दारूची दुकाने रात्री उशिरापर्यंत बेकायदेशीर सुरू असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली होती. वाचा सविस्तर

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *