[ads1]
![]()
एकीकडे ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी अवघा महाराष्ट्र रस्त्यावर उतरला आहे, तर दुसरीकडे या विसर्जन मिरवणुकांवर परतीच्या पावसाचे मोठे सावट निर्माण झाले आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत राज्यात हवामानात मोठे बदल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या नवीन हवामान प्रणालीमुळे राज्याच्या अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह पावसाला सुरुवात झाली आहे. बंगालच्या उपसागरात हवामानात बदल हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या वातावरणावर होत असून, राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील काही तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने राज्यातील तब्बल २१ जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट बंगालच्या उपसागरातील या घडामोडींचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भाला बसण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर राहण्याचा अंदाज असून, हवामान विभागाने या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. येथे जोरदार वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आणि गणेश मंडळांनी विसर्जनादरम्यान योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. १८ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ याशिवाय राज्यातील इतर १८ जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर राहील. जळगाव, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या सर्व भागांत आज विजांच्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हेही वाचा.. पुढच्या वर्षी लवकर या!: राज्यभरात अनंत चतुर्दशीचा अभूतपूर्व उत्साह, मुंबई-पुण्यात ढोल-ताशांचा गजर; 5 कोटी भाविक रस्त्यावर गेल्या दहा-बारा दिवसांपासून मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहाने पुजल्या गेलेल्या आपल्या लाडक्या विघ्नहर्त्या गणरायाला निरोप देण्याचा भावुक क्षण अखेर आला आहे. आज अनंत चतुर्दशीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांची धूम पाहायला मिळत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या एकाच जयघोषाने राज्यातील प्रमुख शहरे आणि गावे दुमदुमून गेली आहेत. सविस्तर वाचा
[ads2]
राज्यातील 21 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट:बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता
















Leave a Reply