[ads1]
लातूर (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पाठवलेल्या विशेष पोलीस पथकाने लातूर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून तिरंट नावाचा जुगार खेळणाऱ्या २० जणांवर कारवाई केली आहे. या कारवायांमध्ये रोकडीसह वाहने व मोबाईल असा एकूण २७,११,७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
देवणी पोलीस ठाणे हद्दीतील कारवाई: दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष पथकाने देवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजी निवृत्ती सगर यांच्या शेतात छापा टाकला. तेथे तिरंट जुगार खेळणाऱ्या ९ इसमांवर कारवाई करण्यात आली.
- जप्त मुद्देमाल: ९,३३० रुपये रोख, ९ मोबाईल, २ चारचाकी वाहने आणि २ मोटार सायकली असा एकूण १५,९३,८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
- गुन्हा नोंद: देवणी पोलीस ठाणे येथे गुरनं ३२६/२०२६, कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
गांधी चौक पोलीस ठाणे (लातूर शहर) हद्दीतील कारवाई: त्यानंतर पथकाने लातूर शहरातील अशोका बार अँड लॉज येथील खोलीत छापा टाकून तिरंट जुगार खेळणाऱ्या ११ इसमांवर कारवाई केली.
- जप्त मुद्देमाल: १,७७,९१० रुपये रोख, १३ मोबाईल, १ चारचाकी वाहन आणि ४ मोटार सायकली असा एकूण ११,१७,९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
- गुन्हा नोंद: गांधी चौक पोलीस ठाणे येथे गुरनं ६६३/२०२६, कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे.
एकूण कारवाई व जप्त मुद्देमाल
दोन्ही कारवाया मिळून एकूण २० जणांकडून १,८७,२४० रुपयांची रोकड, २२ मोबाईल, ३ चारचाकी वाहने आणि ६ मोटार सायकली असा एकूण २७,११,७४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलीस पथक व अभिनंदन
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदिप वाघाडे व गजानन डवरे यांनी केली. पथकाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
खबर हेल्पलाइनचे आवाहन
अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने खबर हेल्पलाइन (मोबाईल क्र. 91 50 100 100) सुरू केली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध धंद्यांची माहिती या क्रमांकावर देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

Post Views: 22
[ads2]
















Leave a Reply