दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:शाळा परिसरात जंकफूड बंदी, पण कोणते पदार्थ?, नियम अस्पष्ट

[ads1]


शाळेच्या ५० मीटर परिसरात जास्त मीठ, साखर आणि चरबी असलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीवर २०२० पासून बंदी आहे. पण, ६ वर्षांनंतरही या बंदीच्या कक्षेत कोणकोणती उत्पादने येतात, हे स्पष्ट नाही. यांची ओळख पटवण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) नुकताच पोषण मर्यादेशी संबंधित मसुदा जारी केला आहे. प्राधिकरणाचे म्हणणे आहे की मानके निश्चित झाल्यानंतर विविध उत्पादनांमधील पोषक घटकांचे प्रमाण पाहून ती बंदीच्या कक्षेत आहेत की नाही हे ठरवले जाईल. म्हणजेच सध्या चिप्स, बिस्किटे, नमकीन, कोल्ड ड्रिंक किंवा इतर कोणत्याही विशिष्ट उत्पादनावर बंदी घालता येणार नाही. सध्याच्या नियमानुसार शालेय कॅन्टीन, मेस, वसतिगृहाचे स्वयंपाकघर आणि गेटपासून ५० मीटरपर्यंत सॅच्युरेटेड फॅट, ट्रान्स फॅट, अतिरिक्त साखर किंवा सोडियम असलेले खाद्यपदार्थ विकण्यास आणि मुलांना भुरळ घालणाऱ्या जाहिरातींवर बंदी आहे. किती प्रमाणावर कोणते उत्पादन हानिकारक मानले जाईल, हे नव्या मसुद्यातून निश्चित केले जाईल. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) खाद्यपदार्थांना त्यांच्या प्रक्रियेच्या आणि पोषण पातळीच्या आधारावर कमी, मध्यम आणि जास्त प्रक्रिया केलेल्या श्रेणींमध्ये विभागते. अति-प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये फक्त जीवनसत्त्वे किंवा खनिजे मिसळल्याने ते आरोग्यदायी होत नाहीत. तपासणी केवळ चिप्स आणि बिस्किटांपुरती मर्यादित राहणार नाही. ज्यूस, नारळपाणी, ताक, लस्सी, चहा-कॉफी यांसारखी पेयेही त्यांच्या पोषण मूल्याच्या आधारे तपासली जातील. अद्याप ना जंक फूड पदार्थांची यादी तयार केली ना आरोग्यदायी मेनू निश्चित केला : एफएसएसएआय एफएसएसएआयमधील सोशल अँड बिहेवियरल चेंज डिव्हिजनचे मॅनेजर कुमार विकास म्हणाले की, शाळांसाठी सक्तीची नमुना भोजन यादी किंवा हेल्दी पर्यायांची यादी अद्याप तयार केलेली नाही. मसुदा अंतिम झाल्यानंतरच पोषक घटकांच्या आधारे ठरवले जाईल की ५० मीटरच्या बंदीच्या कक्षेत किती आणि कोणती उत्पादने असतील. या आधारावर शाळेतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले जाईल. ‘ईट राइट स्कूल’ कार्यक्रम सध्या ऐच्छिक आहे. ५० मीटर नियमावर राज्यांचे अन्न सुरक्षा विभाग लक्ष ठेवतील. हे लागू करण्याची कालमर्यादा निश्चित नाही. निकष: 100 ग्रॅममध्ये 3 ग्रॅमवर साखर धोकादायक
खाद्यपदार्थ अतिरिक्त चरबी अतिरिक्त साखर
घन (प्रति 100 ग्रॅम) 4.2 ग्रॅमपेक्षा जास्त 3 ग्रॅमपेक्षा जास्त
द्रव (प्रति 100 मिली) 1.5 ग्रॅमपेक्षा जास्त 2 ग्रॅमपेक्षा जास्त

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *