हिंगोली / : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर)चे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशाने आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय बाळासाहेब पवार यांच्या पुढाकाराने मराठवाड्यात पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. माननीय दिनेश हनुमंते यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी, ॲड. प्रज्ञावंत मोरे यांची मराठवाडा प्रभारीपदी, तर माननीय आनंद धुळे यांची हिंगोली शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्त्यांमुळे मराठवाड्यात संघटनात्मक कामाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नव्या पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांशी समन्वय साधणे, तळागाळातील जनतेशी संपर्क वाढवणे, युवक व महिलांना संघटनेशी जोडणे आणि सामाजिक प्रश्नांवर संविधानिक मार्गाने भूमिका मांडण्याची जबाबदारी राहणार आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पक्षाचे जास्त जास्त उमेदवार निवडून आणण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
फुले-शाहू-आंबेडकरी विचारांची सामाजिक समता, शिक्षण, स्वाभिमान आणि संविधानिक हक्कांची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी संघटनात्मक काम अधिक प्रभावी करण्याची गरज आहे. पद हे केवळ सन्मान नसून जनतेच्या प्रश्नांसाठी काम करण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून नव्या पदाधिकाऱ्यांकडून कार्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मराठवाड्यात शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन, विद्यार्थी, युवक, महिला आणि वंचित घटकांचे विविध प्रश्न आहेत. या प्रश्नांवर सातत्याने जनसंपर्क ठेवून प्रशासनापर्यंत आवाज पोहोचविणे, कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करणे आणि गावपातळीपर्यंत संघटना उभी करणे हे आगामी काळातील महत्त्वाचे संघटनात्मक काम ठरणार आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माननीय अशोक ससाणे, ठाणे जिल्हा महासचिव तथा अकोला जिल्हा संपर्कप्रमुख माननीय सचिन कोकणे, ठाणे जिल्ह्याचे पदाधिकारी हिंगोली जिल्हा अध्यक्ष माननीय ईश्वर जावळे , ठाणे जिल्हा पदाधिकारी मान.दीपक भालेराव तसेच हिंगोली जिल्हा युवक अध्यक्ष माननीय यशवंत टेंभरे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या नियुक्तीमुळे हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हे समाधानी आणि पक्षात काम करण्यास तयार आहेत.
ह्या केवळ नियुक्ती ची ही सुरुवात आहे,आता संघटन, पक्ष वाढ जनसंपर्क आणि प्रत्यक्ष सामाजिक कामातून या जबाबदारीला दिशा देण्याची वेळ आहे. अशी भावना दिनेश हनुमंते यांनी व्यक्त केली आहे.
















Leave a Reply