[ads1]
![]()
विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि सृजनशीलतेला वाव देण्याच्या उद्देशाने पै फ्रेंड्स लायब्ररी डोंबिवली आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित ‘लेखक व बालवाचक महोत्सव 2026’ अंतर्गत रविवारी (दि. 20) भव्य “स्वरचित कथालेखन स्पर्धे”चे आयोजन करण्यात आले होते. टिळक नगर विद्या मंदिर येथे पार पडलेल्या या स्पर्धेला राज्यभरातून तब्बल 1235 शालेय विद्यार्थ्यांनी हजेरी लावत उदंड प्रतिसाद दिला. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन झाले. या स्पर्धेमध्ये ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, वाशी, कोपरखैरणे, नेरूळ, पनवेल, डहाणू, बोरिवली, दादर या मुंबई-ठाणे परिसरासह जालना, चंद्रपूर, अमरावती, सांगली, अहिल्यानगर आणि नांदेड अशा संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी सहभागी झाले होते. 3 गट आणि 3 भाषांमध्ये रंगली स्पर्धा विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार ही स्पर्धा इयत्ता 4 थी-5 वी (पहिला गट), इयत्ता 6 वी-7 वी (दुसरा गट) आणि इयत्ता 8 वी ते 10 वी (तिसरा गट) अशा तीन गटांत घेण्यात आली. विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांमध्ये आपल्या भावना व कल्पना कथांच्या रूपात मांडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. वाचनानेच लेखनाला धार येईल : आमदार राजेश मोरे उपस्थित विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन करताना आमदार राजेश मोरे म्हणाले, “लहान वयातच मुलांच्या कल्पनाशक्तीला भरारी देण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत कौतुकास्पद उपक्रम आहे. विद्यार्थ्यांनी केवळ लिहिण्यापुरते मर्यादित न राहता विविध भाषांमधील उत्तम साहित्याचे सातत्याने वाचन केले पाहिजे. वाचनामुळेच विचारांना प्रगल्भता येते आणि लेखन समृद्ध होते.” स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला रायटिंग पॅड, पेन, पेन्सिल, पट्टी, खोडरबर, शार्पनर या आवश्यक लेखन साहित्यासह खाऊचा डब्बा आयोजकांकडून देण्यात आला. बालमित्रांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्या पालकांसाठीही सुसज्ज बैठक व्यवस्था व अल्पोपाहाराची सोय करण्यात आली होती. हेही वाचा… IIT मुंबई आत्महत्या प्रकरण:जातीयवादी अपशब्द वापरत तीन महिने मानसिक छळ केल्याचा साहिलच्या वडिलांचा आरोप, प्राध्यापकाविरोधात FIR दाखल आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल रवींद्र वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक सूर्यनारायण डल्ला यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) कायद्याच्या कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून, सध्या मुंबई गुन्हे शाखेकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. सविस्तर वाचा…
[ads2]
डोंबिवलीत रंगली कथालेखनाची जत्रा:‘स्वरचित कथालेखन स्पर्धे’ला राज्यभरातून 1235 विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
















Leave a Reply