[ads1]
![]()
रांजणगाव शे.पू. ग्रामपंचायतीच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला नागार्जुन एज्युकेशनल अँड सोसिअल ट्रस्टची स्वच्छता टीम उपस्थित होती. या टीमने गावातील स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घेतला. कार्यक्रमानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि ट्रस्टच्या स्वच्छता टीमची एक संयुक्त बैठक झाली. या बैठकीत ग्रामपंचायत परिसरातील कचरा संकलनाची सध्याची स्थिती, काम करण्याची पद्धत आणि रोजच्या स्वच्छतेच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीला नागार्जुन एज्युकेशनल अँड सोसिअल ट्रस्टच्या संचालिका किरण बोराडे, संचालक साहिल तूरकर आणि संचालक किशोर म्हस्के खास उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या वतीने प्रशासक अशोक घोडके, ग्रामपंचायत अधिकारी गणेश धनवई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दीपक बडे, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तू हिवाळे, बाबूराव हिवाळे आणि भीमराव कीर्तिकर हे प्रमुख म्हणून उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी गणेश गायके, बाळू कुऱ्हाडे, किशोर काळवने, सिद्धू मुळे, दीपक पंडित, शशिकांत सुरवसे, सुनील वाकूडकर, कलीम शेख, उमेश गवळी, राजू देसाई, वैभव पंडित, संतोष बोटवे, संतोष जैस्वाल यांच्यासह अनेक सफाई कामगार आणि घंटागाडीचे चालक मोठ्या संख्येने हजर होते. बैठकीदरम्यान सध्या काम करणाऱ्या कचरा संकलन कर्मचाऱ्यांची स्वच्छता टीमशी ओळख करून देण्यात आली. त्यानंतर स्वच्छता टीमने सुपरवायझरसोबत संपूर्ण ग्रामपंचायत परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी करताना कचरा संकलन व्यवस्था, स्वच्छतेची सध्याची स्थिती आणि रोजच्या कामाबद्दल आवश्यक माहिती गोळा करण्यात आली. जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नु पी. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ आणि स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. त्यानुसार, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी जारी केलेल्या ‘घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६’ च्या कडक अंमलबजावणीवरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. गावात ओला, सुका, सॅनिटरी आणि घरगुती धोकादायक अशा चार प्रकारांत कचरा वेगळा करणे बंधनकारक आहे. कचरा वेगळा न करणाऱ्यांवर आणि उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंड आकारणे, तसेच वापरकर्ता शुल्क प्रभावीपणे लागू करण्याबाबत ग्रामपंचायतीने नियोजन केले आहे. नागार्जुन एज्युकेशनल अँड सोसिअल ट्रस्टच्या स्वच्छता टीमच्या मदतीने गावातील स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन अधिक नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि प्रभावी करण्यासाठी पुढील काम केले जाईल. ग्रामपंचायत प्रशासन, लोकप्रतिनिधी, कर्मचारी आणि स्वच्छता टीम यांच्या एकत्रित प्रयत्नातून रांजणगाव शे.पू. गाव अधिक स्वच्छ, सुंदर, हरित आणि कचरामुक्त करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
[ads2]
नागार्जुन ट्रस्टच्या टीमने रांजणगाव शे.पू. येथील स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घेतला:ओला, सुका, सॅनिटरी, धोकादायक कचरा वेगळा करणे बंधनकारक केले
















Leave a Reply