जेन झी आंदोलनातही जातीयवाद; आंबेडकरवादी तरुण एकटा पडला:अहिल्यानगरमध्ये ख्रिश्चन समाजाला टार्गेट केले जातेय- सुजात आंबेडकर

[ads1]


‘जेन झी’ने केलेल्या नुकत्याच झालेल्या आंदोलनामध्ये शाहू, फुले आणि आंबेडकरवादी विचारांच्या जेन झी तरुणांची बाजू कोणीही योग्य पद्धतीने मांडली नाही. या आंदोलनातही जातीयवाद दिसून आला, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर शाहू, फुले, आंबेडकरवादी तरुणांना एकत्र आणण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरात ‘जय भीम जेन झी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुजात आंबेडकर म्हणाले की, 2013 पासून सर्व आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची हीच भूमिका होती की नीट परीक्षाच रद्द झाली पाहिजे. मात्र, ‘सीजीपीए’ आंदोलनकर्ते केवळ कायदे सुधारण्याची भाषा करतात. हे लोक ‘आरक्षण हटाव’ प्रवृत्तीविरोधात काहीच बोलत नाहीत. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे आरक्षण धोक्यात आले आहे, त्यावर हे आंदोलनकर्ते शांत आहेत. परंतु, दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतात. यामुळे फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांना मानणारा जेन झी मोठ्या प्रमाणावर एकटा पडला आहे. अहिल्यानगरमध्ये ख्रिस्ती समाजाला टार्गेट केले जात आहे सुजात आंबेडकर म्हणाले की, अहिल्यानगरमध्ये ख्रिस्ती धर्मीय लोकांना विनाकारण त्रास देण्याचे प्रकार सुरू आहेत. चर्चमध्ये किंवा कुठेही लोक एकत्र आले की बळजबरीने धर्मांतर केले जात असल्याचा खोटा आरोप केला जात आहे. भाजप सरकारच्या काळात अल्पसंख्याक ख्रिश्चन समाज स्वतःला असुरक्षित समजत आहे. या कठीण काळात वंचित बहुजन आघाडी ख्रिश्चन समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. धर्मांतरविरोधी कायद्याविरोधात बाळासाहेब आंबेडकर कोर्टात जाणार सुजात आंबेडकर म्हणाले की, भाजपचे बहुमत असल्याने विधानसभा आणि विधान परिषदेत हा धर्मांतरविरोधी कायदा मंजूर झाला असला, तरी तो न्यायालयात टिकेल असे वाटत नाही. ॲड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर या कायद्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. ख्रिश्चन समाजात जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय धर्मांतर होत नाही, तरीही उगाच ग्राम अन् तालुका स्तरावर लोकांना टार्गेट करून अटक केली जात असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. हे ही वृत्त वाचा दिशा सालियानच्या वडिलांकडून नौटंकी सुरू- संजय राऊत:म्हणाले- फडणवीस यांनी दिल्लीत जाण्यापेक्षा विदर्भातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाव
दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकारणावर आणि मातोश्रीसमोर झालेल्या आंदोलनावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. दिशा सालियानच्या निधनाचे आम्हा सर्वांना दुःख आहे. पण तिच्या वडिलांकडून सध्या नौटंकी सुरू आहे. असा जाहीर तमाशा करणे हे त्या मुलीचे दुर्दैव आहे की तिला असा बाप मिळाला. मृत्यू संशयास्पद असेल तर चौकशी झालीच पाहिजे, पण मातोश्रीवर येऊन तमाशे का करत आहात? त्यामागे काय ‘उलाढाल’ झाली आहे, हे आम्हाला सर्व माहिती आहे, असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला. वाचा सविस्तर

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *