डीआयजी शहाजी उमाप ॲक्शन मोडमध्ये; परभणी-हिंगोलीत जुगार अड्ड्यांवर धाडी टाकून २३.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त!

[ads1]

हिंगोली/परभणी (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी आपल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचे एक विशेष पथक परभणी व हिंगोली जिल्ह्यात रवाना केले होते. या पथकाने परभणी आणि हिंगोली येथील दोन जुगार अड्ड्यांवर छापा टाकून ४५ जणांवर कारवाई केली असून एकूण २३,५२,०७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिंतूर, जिल्हा परभणी येथील कारवाई

दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी जिंतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे भिलज येथे गजानन ज्ञानदेव गित्ते यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये पथकाने छापा टाकला. त्या ठिकाणी उपस्थित लोक पैसे लावून पपलू नावाचा जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी केली असता, दोस्ती मित्र मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट, जिल्हा ठाणे यांच्या परवान्याच्या नावाखाली गजानन गित्ते यांच्यामार्फत हा जुगार बेकायदेशीरपणे चालवला जात असल्याचे आढळून आले.दोस्ती मित्र मंडळ चॅरिटेबल ट्रस्टच्या नावावर चालणार जुगार अड्डा हिंगोली शहरात सुद्धा उध्वस्त करण्यात आला होता. 

  • जप्त मुद्देमाल: या कारवाईत ३८ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १,०२,४१० रुपयांची रोख रक्कम, ३३ मोबाईल, १ चारचाकी वाहन आणि १० मोटार सायकली असा एकूण १३,८७,८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
  • गुन्हा दाखल: याबाबत जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ५५०/२०२६, कलम ४, ५, १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वसमत शहर, जिल्हा हिंगोली येथील कारवाई

जिंतूर येथील कारवाईनंतर पथकाने हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भट्टी गल्लीत धाड टाकली.

  • जप्त मुद्देमाल: या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या ७ जणांवर कारवाई करून ७०,२६० रुपयांची रोख रक्कम, ११ मोबाईल आणि ११ मोटार सायकली असा एकूण ९,६४,२६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
  • गुन्हा दाखल: या प्रकरणी ७ जणांविरुद्ध वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ५८७/२०२६, कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे.

कारवाईचा एकूण तपशील

दोन्ही कारवायांमध्ये मिळून विशेष पथकाने एकूण ४५ जणांकडून १,७२,६७० रुपयांची रोख रक्कम, ४४ मोबाईल, १ चारचाकी वाहन आणि २१ मोटार सायकली असा एकूण २३,५२,०७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विशेष पथकाचे अभिनंदन

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस अंमलदार प्रदिप खानसोळे, गणेश राठोड, प्रमोद जाधव, संदिप वाघाडे आणि गजानन डवरे यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकातील सर्व अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केले आहे.

खबर हेल्पलाइनवरून माहिती देण्याचे आवाहन

नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचवता यावी यासाठी पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने ९१ ५० १०० १०० हा मोबाईल क्रमांक असलेली खबर नावाची हेल्पलाइन सुरू केली आहे. नागरिकांनी आपल्या भागातील कोणत्याही अवैध व्यवसायांची माहिती या हेल्पलाइनवरून पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

या दोन गुन्ह्यांमधील आरोपी अर्थात जुगारी पुढील प्रमाणे आहेत ..

CR NO 550-26.pdf

अनुक्रमांक १ ते ४ ची नावे समजली नाहीत.

  • ५. गजानन शंकर पालवे
  • ६. जीवन परसराम राठोड
  • ७. भारत सुभाष दळवी
  • ८. बालाजी रामदास आडे
  • ९. बबन प्रल्हाद राठोड
  • १०. राजू हरीश्चंद्र राठोड
  • ११. भाऊ वरजन आडे
  • १२. गुलाब लक्ष्मणराव कदम
  • १३. रमेश विश्वनाथ आडे
  • १४. राहुल विनायक चव्हाण
  • १५. रामराव प्रभु जाधव
  • १६. मनोज दामोधर वरणकर
  • १७. गणेश कणीराम राठोड
  • १८. गणपत पांडुरंग राठोड
  • १९ जनार्दन भागोजी राठोड
  • २०. गजानन सटवाजी कोकाटे
  • २१. प्रकाश गुलाब जाधव
  • २२. नागनाथ माधव सेंगेकर
  • २३. शिवराम लिबाजी ठाकरे
  • २४. रामप्रसाद सुधाकर देवकर
  • २५. नारायण पांडुरंग राठोड
  • २६. राजू अमलराव घुगे
  • २७. लक्ष्मण लाला राठोड
  • २८. ज्ञानदेव महादेव राठोड
  • २९. सचिन पंडीत राठोड
  • ३०. राजेश चांगोजी कावळे
  • ३१. भास्कर सखाराम पवार
  • ३२. अर्जुन शंकरराव राठोड
  • ३३. दत्ता सोमराव कुटे
  • ३४. गणेश निवृत्ती सुरवसे
  • ३५. अमोल सुदाम जाधव
  • ३६. रामेश्वर भगवान जाधव
  • ३७. परमेश्वर राजाराम भुतकर
  • ३८. दोस्ती मित्र मंडळाच्या व्यवस्था संचालक

२. FIR-I.I.F.-I_19846007260587

  • १. शिवम शिवानंद कोळपेकर
  • २. आकाश व्यंकट साखरे
  • ३. नागेश कैलास दातार
  • ४. राहुल कुंडलिक खरे
  • ५. किशन सिताराम वडीपल्ली
  • ६. नितीन लक्ष्मण लहाने
  • ७. अमोल दत्ताराव शिरसागर

 

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *