[ads1]
![]()
पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात शुक्रवारी गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील लाटेआळी येथील आंबेडकर नगर परिसरात सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास एका तरुणावर अज्ञातांनी गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात हरी गंगावणे नावाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, या घटनेमुळे शहरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. परिसरात अचानक गोळीबाराचा मोठा आवाज झाल्याने स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी हरी गंगावणे हा रक्ताच्या थारोळ्यात गंभीर अवस्थेत पडलेला आढळून आला. मात्र, शरीरात गोळ्या घुसल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता, ज्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. या घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले, पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्यासह फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची सविस्तर पाहणी केली. ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, यामागे काही जुना वाद होता की अन्य कोणते कारण आहे, याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, हरीश गंगावणे बियर बार चालवत होता आणि बिलाच्या वादातून ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे. गोळीबार करून पसार झालेल्या हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशांनी तपास वेगाने सुरू करण्यात आला आहे. संशयित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. परिसरातील उपलब्ध माहिती, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे पोलीस मारेकऱ्यांचा कसून शोध घेत आहेत.
[ads2]
शिरूरमध्ये बिलाच्या वादातून तरुणाची गोळ्या झाडून हत्या!:लाटेआळी परिसरात घडली घटना; बारचालक हरी गंगावणे याचा जागीच मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू
















Leave a Reply