[ads1]
![]()
राज्यातील आगामी निवडणुकांच्या तोंडावर मतदार याद्यांमधील संभाव्य घोळावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील तब्बल २ कोटी ६६ लाख मतदारांच्या नोंदींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अल्पसंख्याक आणि एससी-एसटी बहुल मतदारसंघांमधील मतदार जाणीवपूर्वक वगळले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, निवडणूक आयोगाची भाषा आणि कार्यपद्धती पाहता आयोग सत्ताधाऱ्यांचा गुलाम झाल्यासारखा वागत आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केली. आकडेवारीतील मोठा घोळ आणि संशय मतदारांबाबत निवडणूक आयोगाने पारदर्शक आणि सविस्तर माहिती जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, “महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR 26) नुसार स्थलांतरित, मृत आणि दुबार नोंदी असलेले मिळून जवळपास २ कोटी ६६ लाख ८८ हजार ४७८ मतदारांवर प्रश्न निर्माण झाला आहे. याचाच अर्थ राज्यातील तब्बल २१.४१ टक्के मतदार अंतिम यादीतून वगळले जाण्याची दाट शक्यता आहे.” या आकडेवारीचे सविस्तर विश्लेषण करताना त्यांनी सांगितले की, “यापैकी ७६ लाख ७६ हजार १३५ मतदार ‘स्थलांतरित’ आणि ७५ लाख ४१ हजार ५२० मतदार ‘गैरहजर’ म्हणून दाखवण्यात आले आहेत. विसंगतीच्या नावाखाली ६२ लाख ४८ हजार २८१ मतदार दाखवले आहेत. हा सगळा एकत्रित आकडा दोन कोटींच्या पुढे जातो, जो अत्यंत संशयास्पद आहे.” अल्पसंख्याक आणि एससी-एसटी बहुल मतदारसंघांना लक्ष्य केल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगाच्या हेतूवरच शंका उपस्थित केली. ते म्हणाले, “राज्यातील ३८ अल्पसंख्याक किंवा मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदार वगळले गेले आहेत. हा आकडा तब्बल २९.७७ टक्के इतका मोठा आहे. निवडणूक आयोगाच्या भाषेवर तीव्र आक्षेप निवडणूक आयोगाने नुकत्याच केलेल्या एका दाव्याचा आणि सोशल मीडियावरील पोस्टचा वडेट्टीवार यांनी समाचार घेतला. आयोगाने इतर मतदारसंघांतही मतदान कमी झाल्याचे सांख्यिकीय विश्लेषण दिले होते. मात्र, सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये आयोगाने ‘सो-कॉल्ड मुस्लिम डॉमिनेटेड विधानसभा मतदारसंघ’ असा शब्दप्रयोग केल्याने वडेट्टीवार संतप्त झाले. “अरे लाज तरी ठेवा, निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक पदावर बसून तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम झाल्यासारखे वागताय. अशा प्रकारची भाषा वापरणे आयोगाला शोभते का?,” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. काही विशिष्ट मतदारसंघांत २१ टक्के आणि मुस्लिम बहुल क्षेत्रात २९ टक्के मतदान कमी झाल्याचे दाखवून आयोग कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहे, असा सवालही त्यांनी विचारला. या नव्या आकडेवारी आणि आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत. हेही वाचा.. सत्तेच्या स्थैर्यासाठीच दिवे लावण्याचं फर्मान:मोदींच्या वाढदिवसावरून राऊतांचा भाजपवर घणाघात, म्हणाले- सरकारचा कठीण काळ सुरू झालाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा वाढदिवस नुकताच साजरा झाला. या निमित्ताने भाजपकडून देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “अशुभ काळाची चाहूल लागल्यामुळेच सत्तेच्या स्थैर्यासाठी आणि मोदींना ऊर्जा मिळण्यासाठी भक्तांना आशिर्वादाचे दिवे लावायला सांगितले जात आहे. पण दिवे लावा, काहीही करा… ग्रह कधीच रजेवर जात नाहीत!”, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला आहे. सविस्तर वाचा
[ads2]
निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा गुलाम:मतदार यादीतील 2 कोटी 66 लाखांच्या घोळावरून विजय वडेट्टीवारांचा घणाघात
















Leave a Reply