[ads1]
![]()
ऑल आर्टिस्ट फाऊंडेशन ट्रस्टच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे आज उद्घाटन झाले. पुणे शहरातील सिंहगड रोडवरील पानमळा येथील मैथिली सभागृहाच्या आवारात हे कार्यालय सुरू झाले आहे. या संस्थेमुळे महाराष्ट्रातील लावणी, लोकधारा, ऑर्केस्ट्रा, बॅकस्टेज कलाकार, नाटक, एकपात्री प्रयोग आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकारांना हक्काची जागा मिळाली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आभासी माध्यमाद्वारे या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी संवाद साधला. चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘कार्यालय असेल तर कोणतीही संघटना जोमाने काम करू शकते. कार्यालयाशिवाय संघटनेला रूप येत नाही. त्यामुळे ऑल आर्टिस्ट फाऊंडेशन ट्रस्टचे हक्काचे कार्यालय होणे हा संस्थेसाठी अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे.’ त्यांनी पुढे सांगितले की, येत्या काळात ही संस्था पुण्याच्या संस्कृतीचा केंद्रबिंदू बनेल. यावेळी त्यांनी कमी भाडे घेऊन संस्थेला कार्यालय उपलब्ध करून दिल्याबद्दल मैथिली स्टुडिओचे मिलिंद माळी यांचे विशेष कौतुक केले. या उद्घाटन प्रसंगी नगरसेविका रुपाली धावडे, मंजूश्री खर्डेकर, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संदिप खर्डेकर, नगरसेविका वृषाली रिठे, पिंपरी-चिंचवड कलाकार महासंघाचे अध्यक्ष विजयकुमार उलपे, लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर, मैथिली स्टुडिओचे मिलिंद माळी आणि समुत्कर्षच्या मधुरा वैशंपायन उपस्थित होते. ‘ऑल आर्टिस्ट फाऊंडेशन ट्रस्ट’चे अध्यक्ष योगेश सुपेकर म्हणाले, ‘संस्था सुरू होऊन सहा वर्ष झाली, पण कार्यालय नसल्याने हॉटेलमध्ये किंवा इतर ठिकाणी भेटून काम करावे लागत होते. आता शहराच्या मध्यवर्ती भागात हक्काची जागा मिळाल्याने संस्था आणखी जोमाने काम करेल.’ त्यांनी संस्थेच्या मागील सहा वर्षांतील कार्याची माहिती दिली. संस्थेने कलाकारांना खाना ते दवाखाना, शासनाच्या विविध योजना, समुत्कर्ष योजनेचे कार्ड आणि १० लाख रुपयांचे अपघाती विमे वाटप केले आहे. कलाकारांच्या कुटुंबियांना अडचणीच्या प्रसंगी मानसिक आधार व आर्थिक सहाय्य देणे, युवा आणि ज्येष्ठ कलाकारांना हक्काचा मंच उपलब्ध करून प्रोत्साहन देणे असे कार्य संस्थेने केले आहे. कलेच्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या कलावंतांचा ‘कलाभूषण’ किंवा ‘कलादर्पण’ यांसारख्या पुरस्कारांनी संस्थेमार्फत गौरव केला जातो. तसेच संस्था सामाजिक भान राखत समाजासाठीही वेळोवेळी काम करत असते.
[ads2]
ऑल आर्टिस्ट फाऊंडेशन ट्रस्टच्या कार्यालयाचे उद्घाटन:सिंहगड रोडवर कलाकारांना मिळाली हक्काची जागा; मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित
















Leave a Reply