[ads1]
![]()
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. या प्रसंगी त्यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून मराठवाड्याच्या स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. मात्र, व्यग्र वेळापत्रकामुळे शहरातील कोट्यवधी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे वर्षदेखील दुष्काळाचे वर्ष ठरत आहे. सुरुवातीला पाऊस झाला, पण आता पावसाने मोठा खंड दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील. 5 ऑक्टोबरनंतर पिकांचे पंचनामे केले जातील. एनडीआरएफची मदत तर शेतकऱ्यांना मिळणारच आहे, पण त्यापूर्वीच राज्य सरकार आपली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल.
दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे विभागीय आयुक्तालयावर निदर्शने केली जाणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे. यात हजारो कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता असून त्यांच्या वाहनांसाठी शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावर पार्किंगची व्यवस्था केली आहे. दरम्यान, ठाकरे यांचे रात्री शहरात आगमन झाले. त्यांनी सिद्धार्थ उद्यानात हुतात्मांना आदरांजली अर्पण केली. मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती मराठवाड्यात यंदा पावसाने दडी मारल्याने अत्यंत गंभीर आणि भीषण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. विभागातील बहुतांश धरणांमध्ये अवघा 20 टक्के जलसाठा शिल्लक राहिल्याने मोठे संकट ओढवले आहे. ऐन पावसाळ्यातच पिकांना पाणी मिळेनासे झाल्याने बहुतांश पिके करपून गेली आहेत. परिस्थिती इतकी बिकट आहे की, पावसाळ्याच्या दिवसांतच अनेक भागांत पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे लागले आहेत. पावसाच्या अभावामुळे भविष्यात गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय बोलतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. काय परिणाम होणार? मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाल्यामुळे आणि विकास प्रकल्पांचे उद्घाटन ऐनवेळी लांबल्याने मराठवाड्याच्या हाती काय पडले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली सर्जिकल इमारत, कॅन्सर रुग्णांसाठी अत्यंत आवश्यक असलेली पेट स्कॅन व रेडिएशन मशीन्स आणि प्रवाशांसाठी 61 नव्या एसी बसेस जनतेच्या सेवेत दाखल होण्यास आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. स्थानिक प्रशासनाने उद्घाटनाची संपूर्ण तयारी केली होती; मात्र मुख्यमंत्र्यांच्या व्यग्रतेमुळे या सर्व कामांचा हिरमोड झाला आहे. पुढील दौऱ्यात उद्घाटन कोणत्याही कार्यक्रमाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून अधिकृत दुजोरा नव्हता. प्रत्येक विभागाने त्यांच्या प्रकल्पांचे उद्घाटन व्हावे म्हणून मागणी केली होती. परंतु मुख्यमंत्र्यांच्या व्यग्रतेमुळे वेळ देणे शक्य नव्हते. पुढील दौऱ्यात या प्रकल्पांचे उद्घाटन केले जाईल. – किशोर शितोळे, शहराध्यक्ष, भाजप हे होते नियोजित कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या वेळेअभावी खालील महत्त्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन लांबणीवर पडले आहे: कार्यक्रमाला एमआयएम राहणार उपस्थित एमआयएमचे नेते समीर बिल्डर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्याच्या प्रलंबित प्रश्नांवर निवेदन देण्यासाठी पक्षाने मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागितली आहे. एमआयएमच्या नगरसेवकांन कमी निधी देण्यात येतो ही आमची तक्रार आहे, असे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. प्रशासनाने अद्याप भेट घडवून आणलेली नाही. वेळ न मिळाल्यास पक्षाचे वरिष्ठ नेते जी भूमिका घेतील, त्यानुसार पुढील पाऊल उचलले जाईल, असे विरोधी पक्षनेते साजेद बिल्डर यांनी सांगितले. दरम्यान, मी स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे, असे इम्तियाज यांनी स्पष्ट केले.
[ads2]
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण, हुतात्मा स्मारकाला अभिवादन
















Leave a Reply