15 फूटांची गणेश मूर्ती स्पीड ब्रेकरवर कोसळली:धारावीत खळबळ, परिसरात तणाव

[ads1]


गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धारावी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. कारखान्यातून मंडपात नेण्यात येत असलेली तब्बल 15 फूट उंचीची गणेश मूर्ती ट्रॉलीवरून खाली कोसळल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. या घटनेत ट्रॉलीजवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली असून, त्याच्यावर भाभा रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले आहेत. ही घटना धारावीतील व्ही. बी. नगर, प्रेमनगर परिसरातील बैलबाजार येथे ओम शक्ती फाऊंडेशनजवळ घडली. गणेश मूर्ती कारखान्यातून मंडपात नेण्यासाठी ट्रॉलीमधून नेण्यात येत होती. मात्र, शीतल तलाव परिसरात स्पीड ब्रेकरवरून ट्रॉली ओढताना अचानक तोल गेल्याने ही विशाल गणेश मूर्ती खाली कोसळली. 15 फूट उंचीची मूर्ती अचानक कोसळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात कोसळलेल्या गणेश मूर्तीचे शीतल तलावात विसर्जन करण्यात आले. दरम्यान, या घटनेत ट्रॉलीजवळ असलेल्या एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली. जखमी व्यक्तीला तातडीने भाभा रुग्णालयात नेण्यात आले असून, त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले आहेत. या घटनेनंतर प्रशासनाच्या व्यवस्थापनावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी या घटनेसाठी प्रशासनाला जबाबदार धरले आहे. एवढ्या मोठ्या मूर्तीची वाहतूक करताना आवश्यक सुरक्षेची योग्य व्यवस्था करण्यात आली होती का, तसेच ट्रॉली आणि मार्गाची पाहणी करण्यात आली होती का, असे प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या आकाराच्या मूर्तींची वाहतूक करताना विशेष काळजी घेणे आवश्यक असते. मात्र, धारावीतील या घटनेमुळे विशाल गणेश मूर्तींच्या वाहतुकीतील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झाली नसली तरी परिसरात काही काळ भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हेही वाचा.. जरांगेंच्या उपोषणाचा 11वा दिवस:विखे पाटलांच्या भूमिकेवर जरांगे संतापले, म्हणाले- आता सुट्टी नाही, त्यांनी मराठ्यांचे वाटोळे केले मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 11वा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ भेटून गेल्यानंतर मागण्यांबाबत आश्वासन मिळाले होते. मात्र, त्यानंतर ठोस कार्यवाही होत नसल्याने जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी पाणी आणि उपचार घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे आंदोलनस्थळी उपस्थित मराठा समाजबांधवांमध्ये त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली आहे. सविस्तर वाचा..

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *