नागपूर रेल्वेला 19 महिन्यांत 20 कोटींहून अधिकचा महसूल:एसी डब्यांमधून बेडरोल साहित्याची चोरी करणारे आरोपी अजूनही मोकळे

[ads1]


मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला गेल्या १९ महिन्यांत (१ जानेवारी २०२५ ते ३१ जुलै २०२६) विविध स्त्रोतांतून २० कोटी ८४ लाख रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला आहे. मात्र, याच काळात एसी डब्यांमधून बेडरोल साहित्याची चोरी करणाऱ्या एकाही आरोपीला रेल्वे सुरक्षा बल (RPF) पकडू शकले नाही, ही चिंतेची बाब आहे. ही माहिती माहिती अधिकार कायद्यांतर्गत रेल्वे प्रशासनाने दिली आहे. माहितीनुसार, नागपूर रेल्वे स्थानकावरील फेरीवाले, कॅटरिंग स्टॉल्स, बहुउद्देशीय स्टॉल्स, मिल्क स्टॉल्स, फळ विक्रेते, परवाना शुल्क आणि दंडात्मक वसुलीतून सर्वाधिक १२ कोटी ७९ लाख २८ हजार ५५१ रुपये जमा झाले आहेत. याव्यतिरिक्त, वाहन पार्किंगच्या कंत्राटातून ३ कोटी ९२ लाख ५४ हजार ७३० रुपयांचे उत्पन्न मिळाले. जाहिरात होर्डिंग्स, डिजिटल आणि नॉन-डिजिटल ‘रेल डिस्प्ले नेटवर्क’ व मोबाईल ॲसेट्सच्या माध्यमातून ३ कोटी २८ लाख ९५ हजार रुपयांचा महसूल मिळाला. तसेच ‘नॉन-फेअर रेव्हेन्यू’ उपक्रमांतर्गत मिनी रिफ्रेशमेंट रूममधून ८४ लाख ९ हजार ३१० रुपये जमा झाले आहेत. महसुलात वाढ झाली असली तरी, रेल्वे मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. याच काळात नागपूर विभागात २१ लाख २६ हजार ५५८ रुपयांची रेल्वे मालमत्ता चोरीला गेल्याची नोंद रेल्वे सुरक्षा बलाकडे आहे. सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या तपासणीत, प्रवासादरम्यान हरवलेल्या ४ मुलांचा शोध घेण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले. तसेच, हरवलेल्या ८ ज्येष्ठ नागरिकांपैकी ५ जणांना सुरक्षितपणे शोधून त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आले.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *