[ads1]
![]()
महाराष्ट्रात यंदाच्या पावसाळ्यात पावसाचे प्रमाण चढ-उताराचे राहिले आहे. जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यानंतर जुलैमध्ये राज्याच्या अनेक भागांत दमदार पाऊस झाला आणि धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली. मात्र, ऑगस्टमध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही. आता सप्टेंबरमध्येही पावसाची सरासरी कमी राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील मान्सूनचे वारे सध्या कमजोर झाले आहेत. वातावरणातील आर्द्रता कमी असून राज्यावर प्रभावी हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने पुढील चार ते पाच दिवस पावसाची शक्यता कमी आहे. या काळात राज्याच्या बहुतांश भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात एकूण पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मराठवाड्यात दुष्काळाची छाया दरम्यान, मराठवाड्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने परिस्थिती अधिक गंभीर होताना दिसत आहे. अनेक भागांत सुमारे 35 दिवसांपासून पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप पिकांवर परिणाम होऊ लागला असून काही ठिकाणी पिके करपण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पाणीसाठा कमी होत असल्याने आगामी काळातील जलसंकटाची चिंता देखील वाढली आहे. मराठवाड्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्याची स्थितीही चिंताजनक आहे. सिना कोळेगाव धरणातील उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्क्यांवर पोहोचला असून अनेक धरणांमध्ये 25 टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा शिल्लक आहे. पेरणीनंतर पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोर खरीप पिके वाचवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. जलसंपदा विभाग आणि मराठवाडा विभागीय आयुक्तालयाच्या 7 सप्टेंबर 2026 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, छत्रपती संभाजीनगर विभागातील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अनेक प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठ्यात घट नोंदवली गेली आहे. मराठवाड्यात एकूण पावसाचे प्रमाण सुमारे 57.1 टक्क्यांवर असून लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट अधिक असल्याचे आकडेवारीतून समोर येत आहे. पावसाने आणखी काही दिवस अशीच दडी मारल्यास मराठवाड्यातील शेती आणि पाणीपुरवठ्याच्या संकटात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता पुढील हवामान अंदाजाकडे लागले आहे. मराठवाड्यावर 14 वर्षांनंतर दुष्काळी सावट मराठवाड्यात ऑगस्टच्या २६ दिवसांत पावसाने पाठ फिरवली. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाची ३४ टक्क्के तूट आहे. त्यामुळे मराठवाड्यावर १४ वर्षांनंतर दुष्काळाचे सावट आहे. म्हणून सर्व पाणीसाठे पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे तसेच धरणातून अनधिकृत उपसा करणाऱ्या मोटारी जप्त करण्याचे आदेश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी सोमवारी दिले. जायकवाडी धरणात मुबलक साठा असल्याने छत्रपती संभाजीनगर शहराला तुटवडा जाणवणार नाही. उद्योगांना पाणी कपातीचे अद्याप धोरण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, दरम्यान, महाराष्ट्राच्या बहुतांश भागात ५ ऑगस्टनंतर पावसाने पाठ फिरवली असून, त्यामुळे राज्यातील खरिपाची पिके संकटात सापडली आहेत. विशेष म्हणजे आॅगस्ट महिन्यात राज्यात सरासरी २८६ मिमीच्या तुलनेत केवळ १४०. १ मिमी (४९ टक्के) पाऊस पडला. बहुतांश भागात १ ते ५ आॅगस्टदरम्यान पर्जन्यवृष्टी झाली. त्यानंतर काही तुरळक ठिकाणी वगळता आॅगस्ट कोरडा गेला आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही पाऊस झाला नाही. मराठवाड्यासह अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यात मका, सोयाबीन, कापूस, तूर, मूग व उडीद या पिकांवर पावसाअभावी प्रतिकूल परिणाम होत असल्याचे कृषी विभागाच्या पाक्षिक अहवालात म्हटले आहे. ४५० गावे तहानलेली, रब्बीवरही पाणी : सध्या मराठवाडा विभागातील ४५० गावांची तहान भागवण्यासाठी ८८ टँकर्स सुरू आहेत. भविष्यातील तीव्र पाणीटंचाई टाळण्यासाठी मांजरा आणि माकणी धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या धरणांवर आता अधिकाऱ्यांची गस्त वाढवली असून, मोटारी जप्त करण्याची कारवाई सुरू होणार आहे. विशेष म्हणजे उद्योगाचे पाणी कपात करण्याचे कोणतेही अद्याप नियोजन नसल्याचे प्रशासनाने स्पस्ट केले. सविस्तर वाचा बिहारच्या 13 जिल्ह्यांत पूर, 27 लाख लोकांना फटका:उत्तराखंड, हिमाचलमध्ये भूस्खलन; महाराष्ट्राच्या अंबोलीत चेरापुंजीहून जास्त पाऊस गंगा, कोसी, गंडक, बुढी गंडक, पुनपुन आणि बागमती या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे बिहारमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील १३ जिल्ह्यांमधील सुमारे २७ लाख लोक या परिस्थितीमुळे बाधित झाले असून, आतापर्यंत २० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडमध्ये गेल्या आठवड्यापासून अधूनमधून पाऊस पडत आहे. उत्तरकाशीमधील मनेरी-भटवारी महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, हिमाचल प्रदेशात आज पहाटे ५ च्या सुमारास शिमला-किन्नौर राष्ट्रीय महामार्ग-५ वर दरड कोसळण्याची मोठी घटना घडली; यावेळी देवदाराचे एक मोठे झाडही मुळासकट उन्मळून पडले. सविस्तर वाचा
[ads2]
महाराष्ट्रात पावसाला ब्रेक!:पुढील 4-5 दिवस पावसाची शक्यता कमी, मराठवाड्यात दुष्काळाची छाया
















Leave a Reply